आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्वाजामियाँजवळील फळविक्रेत्यांमुळे वाहतुकीचे वाजले बारा; मनपाचे दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश काॅलनी - शहरातील अतिक्रमणाच्या कारवाईत अपयशी ठरत असलेल्या पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन शहराच्या कडेला कायमस्वरूपी दुकाने लावण्याचा धडाका सुरू अाहे. गणेश काॅलनी राेडवरील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर उद्यानाच्या भिंतीला लागून माेठी दुकाने लावण्यात अाली अाहेत. यामुळे दुकानांसमाेरील वाहनांमुळे सतत वाहतुकीचा खाेळंबा हाेत अाहे. असे असताना मात्र पालिका केवळ किरकाेळ विक्रेत्यांना लक्ष्य करून मोठ्यांना अभय देत असल्याचा अाराेप हाेत अाहे. 
 
सुभाष चाैक, बळीरामपेठ, शिवाजी राेडवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झालेला अाहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्या ठिकाणी संपूर्ण ताकद लावल्यानंतरही अपेक्षित बदल झालेला पाहायला मिळत नाही. दरम्यान, प्रभाग अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याचे अधिकार दिल्यानंतरही शहरातील काॅलनी परिसरातील रस्त्याच्या कडेला कायमस्वरूपी लावलेल्या दुकानांचा प्रश्न कायम अाहे. 

गणेश काॅलनी राेडवर गेल्या काही दिवसांत हाॅकर्सचा त्रास वाढत चालला अाहे. रिंगराेड ते गणेश काॅलनी चाैकादरम्यान फळ विक्रेते हातगाडी लावतात. दिवसभर व्यवसाय करून ते रात्री हातगाडी घेऊन निघून जातात. परंतु काही विक्रेत्यांनी मात्र ख्वाजामियांॅ दर्गाजवळ बाराही महिने दुकान लावल्याचे पाहायला मिळत अाहे. त्यामुळे किरकाेळ विक्रेते अाता माेठ्यांवर कारवाई करता लहान विक्रेत्यांना त्रास दिला जात असल्याचा अाराेप करत अाहेत. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर उद्यानालगत भिंतीला लागून फळविक्रेत्यांनी सुमारे १५ फुटाचे दुकान लावले अाहे. त्या ठिकाणी ग्राहक रस्त्यावर वाहनेउभी करतात. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अरूंद हाेऊन वाहतुकीला त्रास हाेत असताे. 
 
जवळच ख्वाजामियांॅ दर्गा असल्याने त्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी हाेत असते. त्यामुळे या भागात वाहतुकीची समस्या कायमची झाली अाहे. दर्गासमाेरील फुल विक्रेत्यांना मध्यंतरी दर्गाच्या अातल्या बाजूला जागा देण्यात अाली हाेती. त्यामुळे रस्ता रूंद झाला हाेता; परंतु गेल्या काही महिन्यापासून फुल विक्रेते पुन्हा रस्त्यावर हातगाड्या लावत असल्याने पुन्हा तीच समस्या निर्माण झाली अाहे. 

पालिकेच्या कारवाईत दुजाभाव नकाे 
पालिकेकडे तक्रार प्राप्त हाेताच अतिक्रमणचे पथक या रस्त्यावर कारवाईसाठी जाते. कारवाईला जाण्यापूर्वीच विक्रेत्यांना माहिती मिळत असल्याने विक्रेते एेन कारवाईच्या काळात गायब असतात. ज्यांच्या अाेळखी नाहीत अशांचा माल जप्त केला जाताे; परंतु माेठे व्यावसायिक यातून सहज सुटतात. त्यामुळे कारवाई करताना लहान, माेठे असा काेणताही दुजाभाव करता सरसकट कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...