आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पाेलिस-दुचाकीस्वार महिलेची रस्त्यात दे दणादण, दुचाकीस्वार महिलेला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंडाळे चौकात महिला वाहतूक पाेलिस आणि दुचाकीस्वार रेखा जाधव यांच्यामध्ये सुरू असलेला वाद. - Divya Marathi
बेंडाळे चौकात महिला वाहतूक पाेलिस आणि दुचाकीस्वार रेखा जाधव यांच्यामध्ये सुरू असलेला वाद.
जळगाव- वाहनपरवाना मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात महिला पाेलिस कर्मचाऱ्याने दुचाकीस्वार महिलेच्या कानात लगावली. त्यावेळी क्षणाचाही विचार करता दुचाकीस्वार महिलेनेही महिला पाेलिसाच्या कानशिलात लगावून प्रत्युत्तर दिले. या गाेंधळामुळे बेंडाळे चाैकात पाऊण तास वाहतूक खोळंबली हाेती. ही घटना बुधवारी दुपारी वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दुचाकीस्वार महिलेस अटक करण्यात अाली अाहे.
ईश्वर काॅलनीतील रेखा डिगंबर जाधव (वय ४६) या बेंडाळे चाैकातून चित्रा चाैकाकडे दुचाकीने (एमएच १९, बीएक्स ५३१८) जात हाेत्या. बेंडाळे चाैकातून पुढे येताच पाेलिस कर्मचारी कविता विसपुते यांनी त्यांना अडवले. थांबवण्याच्या मानसिकतेत नसलेल्या जाधव यांनी थाेड्या अंतरावर गाडी उभी केली. विसपुते यांना या प्रकाराचा राग अाला. त्यांनी रागातच जाधव यांच्याकडे परवान्याची मागणी केली. माझ्याकडे परवाना अाहे, मात्र ताे घरी राहिला अाहे. त्यामुळे मला जाऊ द्या, अशी विनंती वजा धमकी जाधव यांनी दिली. तसेच पळून जाण्याचादेखील प्रयत्न केला. परंतु विसपुते यांनी सुरू असलेली दुचाकी एका हाताने धरून ठेवली. त्यामुळे दाेघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. यातच विसपुते यांनी जाधव यांच्या कानशिलात लगावली. मारल्याचा राग अाल्याने जाधव यांनीही विसपुते यांच्या श्रीमुखात लगावून प्रत्युत्तर दिले. या प्रकारामुळे चाैकात बघ्यांची चांगलीच गर्दी जमली हाेती. सुमारे पाऊण तास गाेंधळ सुरू हाेता. त्यानंतर सहायक पाेलिस निरिक्षक सारीका खैरनार, सहायक फाैजदार राजेंद्र उगले, काॅन्स्टेबल सुनीता वराडे यांनी मध्यस्ती करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. विसपुते यांच्या फिर्यादीवरून रेखा जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा अाणला म्हणून जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात अाली अाहे. पाेलिस उपनिरीक्षक गजानन राठाेड तपास करीत अाहेत.

चूक कोणाची हीच चर्चा
भरचौकात एकमेकांच्या कानशिलात लगावणाऱ्या दुचाकीस्वार महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा गोंधळ पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली हाेती. महिला वाहतूक पोलिसाने सुरुवातीला दुचाकीस्वार महिलेला मारले. त्यामुळे यात महिला पोलिसची चूक असल्याचे काहींचे म्हणने होते. तर गाडी चालवण्याचा परवाना विचारण्याचा राग येऊन पोलिसांशी बाचाबाची करणे नंतर पाेलिसांवर हात उगारणे हे चुकीचे असल्याचेही मत गर्दीतून व्यक्त होत होते. पोलिस, दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी इतर वाहनचालकांनी पुढाकार घेतला. खरी चूक कोणाची याबाबत चौकात चांगलीच चर्चा रंगली हाेती.

पुढीस सालाइड्सवर पाहा, फोटो....