आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौणखनिज तस्करी; वाहने पकडली, जळगाव रोडसह अन्य भागात गस्तीवर भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
भुसावळ - रात्रीच्या अंधारात अवैधरित्या गाैण खनिजची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत कारवाई केली. महसूलच्या तीन पथकांनी सहा डंपर आणि एक ट्रॅक्टर अशा सात वाहनांवर कारवाई केली. 
 
तालुक्यातील गौणखनिज तस्करांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने पथके नियुक्त केली आहेत. गाैणखनिजाची अवैध वाहतूक हाेत असल्याची माहिती मिळाल्याने गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे वाजेपर्यंत तालुक्यातील विविध मार्गांवर या पथकांनी कारवाई केली. या मार्गांवर थांबून पथकाने वाहनांची तपासणी केली. रात्रीच सहा डंपर आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. तालुक्यातील साकेगाव, शिंदी, सुनसगाव अाणि जळगाव राेडवरील वाय पाॅइंटवर कारवाई करण्यात आली. आगामी काळात कारवाईचा वेग आणखी वाढवला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार मीनाक्षी राठाेड यांनी दिली. महसूल विभागाने एकाच रात्री केलेल्या कारवाईमुळे गौणखनिज तस्करांचे धाबे दणाणले आहे. आगामी काळात गौणखनिज तस्करी रोखण्यासह तस्करांवर कारवाई करून दंड वसूल करण्यासाठी महसूल विभागाने नियोजन केले आहे. दंड वसूल करून अपेक्षित करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यावर भर दिला जात असून, उपाययोजना सुरू आहेत. 
 
दंडाची नाेटीस देणार 
महसूल विभागाच्या कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेले डंपर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या अावारात जमा करण्यात आले. त्यात डंपर (क्र.एमएच.१९ झेड.६३६३), (एमएच.१९ बी.एम.७०७०), (एमएच.१९ झेड.२८२६), (एमएच.०४ एम.३४९३), (एमएच.१९ झेड.४९८३), (एमटीएस ९५९६) ट्रॅक्टर (क्र.एमएच.१९ बी.जे.५१५९) अशी वाहने ताब्यात घेतली. वाहनमालकांना दंडाची नाेटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...