आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे, कोच बुकिंगद्वारे कोटी रुपयांचा महसूल, भुसावळ विभागातील स्थिती; प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- रेल्वे प्रशासनाने उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईसोबत स्पेशल रेल्वे गाड्या आणि स्पेशल कोच आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात २० रेल्वे गाड्या ११ काेच बुकिंगमधून भुसावळ विभागाला काेटी ६२ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

लग्न समारंभ, यात्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम आणि शैक्षणिक सहलींसाठी रेल्वे गाड्यांचे डबे अारक्षित केले जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. रेल्वेची १८ डब्यांपेक्षा जास्त डबे असलेली रेल्वे गाडी स्पेशल रेल्वे गाडी म्हणून अारक्षित करता येते. संपलेल्या अार्थिक वर्षात संपूर्ण विभागातून रेल्वेच्या २० विशेष ट्रेन आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला. 
 
अंतरानुसार दर आकारणी 
एखाद्या सहलीसाठी अथवा लग्न समारंभासाठी ज्याप्रमाणे बसचे अारक्षण केले जाते, त्याचप्रमाणे प्रति किमी दराने स्पेशल ट्रेनचे आरक्षण होते. दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर लक्षात घेऊन रेल्वे गाडीच्या आरक्षणाची रक्कम ठरवली जाते. गेल्या आर्थिक वर्षात भुसावळ विभागातून बऱ्हाणपूर, खंडवा, भुसावळ अादी ठीकाणाहून रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्यात आले. 
 
आरक्षणाकडे कल : सुट्यांच्याकाळात रेल्वे प्रवाशांची गर्दी होते. तसेच याच काळात शैक्षणिक सहलींसाठी रेल्वे कोच आरक्षित करण्याचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना रेल्वे आरक्षणासाठी सुविधा दिली जाते. त्यामुळे रेल्वे आरक्षणाकडे शाळांचा कल असतो. 
 
७२ प्रवाशांची क्षमता : भुसावळविभागातील विविध रेल्वे स्थानकांवरून गेल्यावर्षी रेल्वेचे ११ स्पेशल काेच अारक्षित करण्यात आले होते. एका कोचमध्ये ७२ तर काही कोचमध्ये ६० प्रवाशांची व्यवस्था केली जाते. गेल्या वर्षभरात ११ कोचच्या अारक्षणातून रेल्वे प्रशासनाला १५ लाख ५३ हजार रूपयांचा महसूल मिळाला. 
 
सुविधांवर भर : भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून फलाट क्र.१ आणि ३च्या मध्यभागी नवीन शेडची उभारणी केली जात आहे. जंक्शनवर हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. 
 
तिकीट तपासणीची मोहीम राबवणार 
-रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी डीअारएम सुधीरकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू अाहेत. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिकीट तपासणीची विशेष माेहीम राबवली जाणार अाहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवास करताना योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. तिकीट तपासणीची मोहीम आगामी काळातही सुरूच ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी तिकीट घेऊन प्रवास करावा. रेल्वेच्या विकासात योगदान द्यावे. सुनील मिश्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ 
 
बातम्या आणखी आहेत...