आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपणासाठी जीपीएस सर्वेक्षण; ६४ ठिकाणी हजार रोपे लावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - हरितधुळे संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे पावसाळ्यात शहरातील विविध भागातील ६४ मोकळ्या जागांमध्ये साडेआठ हजार वृक्षांचे रोपण केले जाणार आहे. ज्या जागांची वृक्षारोपणासाठी निवड करण्यात आली आहे, त्या जागांचे जीपीएसद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. जंगलाचे प्रमाण कमी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे वृक्षारोपणावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी ते जुलैदरम्यान राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत महापालिकाही सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील मोकळ्या जागा, शाळांचे आवार उद्यानांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील अनेक रोपांची चांगली वाढ झाली आहे. यावर्षीही शासनाच्या आदेशानुसार शहरात अाठ हजार ५०० वृक्षांचे रोपण केले जाणार अाहे. शहरातील माेकळ्या जागांवर हे वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यासाठी वन विभागाच्या रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 

ज्या मोकळ्या जागेवर वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्या जागेचे वन विभागाच्या सहकार्याने जीपीएसद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात जागेची चतु:सीमा निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात येणार आहेत. वृक्षारोपणानंतर वृक्षांचे संवर्धन होते आहे किंवा नाही याची माहिती जीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागांना संरक्षण भिंत आहे. तेथे प्राधान्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपणानंतर त्यांच्या संवर्धनासाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांचे रोपण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी वन विभागाकडे अधिक रोपांची मागणी करण्यात आली आहे. 

गेल्या वर्षी २१०० वृक्षांचे रोपण 
मागील वर्षीही महापालिकेच्या हद्दीत हजार १०० रोपे लावण्यात आली होती. वन विभागाकडून रोपे जास्त उपलब्ध होऊ शकल्याने अनेक भागांमध्ये वृक्षारोपण करता आले नव्हते. त्यामुळे वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डे तसेच होते. यंदा तसे होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

रोपवाटिकेत पाच हजार रोपे 
महापालिकेनेही स्वत:ची रोपवाटिका तयार केली आहे. मागील वर्षी पुरेसे रोपे उपलब्ध झाल्याने ही रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या पांझरा वॉटर पंपिंग स्टेशन येथे वर्षभरापासून रोपे तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी पाच हजार रोपे तयार झाली असून, यात गुलमोहाेरच्या रोपांचा समावेश असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. 

येथे लावणार वृक्ष 
शहरातील विविध भागात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. त्यातील बऱ्याच जागांना संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. त्यातील ६४ जागांची वृक्षारोपण मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. या जागांवर ते जुलैदरम्यान वृक्षारोपण करण्यात येणार आहे. एका ठिकाणी दीडशे ते दोनशे राेपे लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 

महापालिका प्रशासनातर्फे शहरातील ज्या मोकळ्या जागांना संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे त्याच ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडण्यात आलेली जागा. 
बातम्या आणखी आहेत...