आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिकोणी प्रेमातून पत्नीने केला तिघांच्या मदतीने पतीचा घात, पत्नीने रचला कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - तालुक्यातील बेलगंगा देवळी रस्त्याच्या दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात इसमाचा जळीत मृतदेह आढळून आला होता. ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दहाव्या दिवशी खुनाचे गूढ उकलले. अनैतिक संबंधातून त्रिकोणी प्रेमातून मयताच्या पत्नीने तीन साथीदारांची मदत घेऊन पतीला संपवल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह अन्य तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु या प्रकारामुळे तीन परिवार उद्ध्वस्त झाले. 
 
चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा देवळी रस्त्याच्या कडेला १० दिवसांपूर्वी एक अनोळखी पुरुष जातीचे जळालेले प्रेत आढळून आले होते. मयताचे शरीर हे १०० टक्के जळाल्याने त्याची ओळख पटणे कठीण जात होते.
 
शवविच्छेदनाच्या अहवालावरून मयत इसमाच्या डोक्यात दगड टाकून नंतर त्याला भर रस्त्यावर रात्रीच्या वेळी जाळून टाकल्याचे निष्पन्न झाले हाेेते. तेव्हापासून तपासाची चक्रे फिरली. परिसरात काेणी बेपत्ता अाहे काय? याचा शाेध घेण्यात अाला. परंतु तसे काहीच अाढळले नाही. त्यामुळे पाेलिसांना हा खून प्रेम प्रकरणातून अथवा पैशांच्या व्यवहारातून झाला असावा, असा संशय अाला.
 
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रमेश मानकर हे सरकारतर्फे फिर्यादी झाले. अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तपासाची चक्रे फिरवून मयत इसमाच्या वर्णनाची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. 
 
त्रिकाेणी प्रेमात गुरफटलेल्या पत्नीनेच तिच्या प्रियकरांसह पतीला संपवण्यासाठी सापळा रचला. पोलिसांची तपासचक्रे फिरवून अधिक माहिती घेतली असता, गौतम धना सोनवणे (रा.लोहारी ता.पाचोरा), उमेश ऊर्फ वना पाटील साहेबराव विक्रम काेळी (दोघेही रा.उंबरखेड) मयताची पत्नी राधाबाई पवार या चौघांनी डोक्यात दगड टाकून खून केला नंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळले. 
 
त्रिकोणी प्रेमाची सुरुवात 
मयत कैलास पवार हा तीन ते चार महिन्यांपूर्वी चाळीसगाव शहरात आला होता. या वेळी कैलास याने पत्नी राधाबाई हिस काहीतरी कारणावरून मारहाण सुरू केली असता, उमेश पाटील साहेबराव कोळी यांनी कैलास पवार यास समज देऊन राधाबाई हिस मार खाण्यापासून वाचविले. या वेळी राधाबाई पवार हिने उमेश पाटील साहेबराव कोळी यांचे मोबाइल नंबर घेतले पुढे त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तसेच राधाबाई हिचा भाऊ पाचोरा येथे रहात असल्याने चौथा आरोपी गौतम सोनवणे अशा चौघांनी मिळून कैलास पवार याचा खून केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. 
 
आरोपींना घेतले ताब्यात 
खुनाचे गूढ उकलताच पाेलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह पोहेकॉ.मनोहर जाधव, पोहेकॉ.किशोर पाटील, पोहेकॉ.विलास पाटील, पोहेकॉ.विनोद भोई, चालक नितेश पाटील, दीपक पाटील, नांदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक पवार, पोेहेकॉ. ईश्वर भोईर आदींनी रात्रभर फिरून आरोपींना ताब्यात घेतले. 
 
रहस्य असे उलगडले 
नांदगाव येथील पोलिस ठाण्यात मयताची पत्नी इतर नातेवाईक हे मिसिंग नोंदवण्यासाठी गेले. त्या अगाेदरच चाळीसगाव येथे एक जळालेला अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात अाली हाेती. नांदगाव पाेलिसांनी गाेडीगुलाबीने चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाठवले. मयताची पत्नी राधाबाई कैलास पवार हिच्यासह अन्य नातेवाईक आले असता, मयत इसम कैलास रंगनाथ पवार (वय ४०, रा.रोहिले ता.नांदगाव) येथीलच असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. परंतु मयत कैलास पवार याची पत्नी राधाबाई पवार ही मात्र उडवाउडवीची उत्तरे देत होती. तिथेच घटनेचे बिंग फुटले. 
बातम्या आणखी आहेत...