आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक दागिने गहाण ठेवून आदिवासी महिलेने घरामध्ये बांधून घेतले स्वच्छतागृह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - नवापूर तालुक्यातील जामणपाडा येथील आदिवासी महिलेने आर्थिक परिस्थिती बिकट असूनही दागिने गहाण ठेवत शौचालयाचे बांधकाम केले आङे. कुडाच्या कच्च्या घरात राहून लताबाई किमा गावीत यांनी स्वतःचे सर्व पारंपरिक दागिने गहाण ठेवून ३० हजार किंमतीचे पक्के शौचालय आणि स्नानगृह बांधून घेत, नवा आदर्श घालून दिला. त्यांना यासाठी शासनाकडून 12 हजारांचे अनुदान मिळाले. 

लताबाईंनी सांगितले की, कुडाचे घर बांधकाम करण्यासाठी त्यांना 15 हजारांचा खर्च आला होता. पण घरात शौचालय नसल्याने अर्धा किलोमीटर पायपीट करून शेतात शौचालयाला जावे लागायचे. इच्छा असूनही गरिबीमुळे शौचालय बांधता येत नव्हते. त्यामुळे स्वतःचे दागिणे गहाण ठेवून त्यांनी शौचालय व स्नानगृह बांधले. मोदींची जाहिरात पाहून प्रेरणा मिळाल्याचे त्या सांगतात. लताबाई गावीत यांचे घर कच्चे आणि शौचालय पक्के अशी अनोखी परिस्थिती आहे. एका आदिवासी महिलेने दागिन्यांसमोर स्वच्छतागृहला महत्त्व दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी लताबाई गावीत यांचा स्थायी समितीच्या बैठकीत सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, बी.एम मोहन, दत्तू चौरे, आत्माराम बागले आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त होईल
आदिवासीबहुल भागात स्वच्छतेचे महत्त्व वाढले आहे. लताबाईची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना स्वच्छतागृह तयार केले. आदिवासी समाजासाठी कौतुकास्पद बाब आहे. नंदुरबार जिल्हा लवकरच १०० टक्के हगणदारीमुक्त केला जाईल.
रजनी नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा, नंदुरबार
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...