जळगाव - पाऊस सुरू असताना दुचाकी घसरून पडल्यानंतर अंगावरून ट्रक गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री वाजता मुसळी फाट्याजवळ घडली. मृत धुळे-नंदुरबार ग.स.सोसायटी कर्मचारी हाेते. पाळधी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
गणेश कॉलनीतील रहिवासी मूळ बिलखेडा (ता. धरणगाव) येथील सुरेश लोटन भदाणे (३९) हे बुधवारी रात्री वाजता बिलखेडा येथून दुचाकीने (एमएच- १९, - २०७९) जळगावकडे येत होते. मुसळी फाट्याजवळ पाऊस सुरू असल्यामुळे त्यांची दुचाकी घसरल्याने ते पडले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरातील पोल्ट्रीफार्म व्यावसायिकांनी भदाणे यांचा मृतदेह सिव्हिलमध्ये पोहोचवला. काही नागरिकांनी अपघाताचे फोटो व्हाॅट्सअॅपवर व्हायरल केल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यानंतर अनेक नातेवाईक सहकाऱ्यांनी सिव्हीलमध्ये धाव घेतली. भदाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.