Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Truck Accident On Woman Killed

जळगाव: खराब साइडपट्टीने अपघात; विवाहितेला ट्रकने चिरडले, नेरीत वृद्धाचा मृत्यू

प्रतिनिधी | Mar 19, 2017, 09:17 AM IST

  • अपघातात मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच आक्रोश करताना पूनमची आई.
जळगाव -राष्ट्रीय महामार्गावरील खराब साइडपट्टीमुळे दुचाकीचा तोल जाऊन मागे बसलेली विवाहिता रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर पती १० महिन्यांचा चिमुकला बाजूला फेकले जाऊन जखमी झाले. नशिराबादजवळ हॉटेल गारवासमोर शनिवारी दुपारी वाजता हा अपघात झाला.
रामेश्वरनगरातील जैन इरिगेशनचे कर्मचारी प्रशांत सतीश जैन (वय २६) हे पत्नी पूनम (वय २३) अाणि मुलगा श्रेयस (वय १० महिने) यांच्यासह त्यांच्या बलवाडी या मूळगावी (ता.रावेर) धार्मिक कार्यक्रमासाठी गेले हाेते. शुक्रवारी कार्यक्रम अाटाेपल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते पत्नी मुलाला घेऊन दुचाकीने (क्र. एमएच-१९-सीएन-१४७६) जळगावकडे येत होते. त्यांना दुपारी वाजता बांभाेरी येथील जैन इरिगेशन कंपनीत दुसऱ्या शिफ्टला जायचे होते. ते नशिराबादच्या पुढे अाल्यानंतर हाॅटेल गारवाजवळ त्यांची दुचाकी खाली उतरली. साइडपट्टी खाेल हाेती. त्यामुळे परत रस्त्यावर दुचाकी चढवताना त्यांचा ताेल गेला. त्यामुळे पूनम या रस्त्यावर फेकल्या गेल्या तर प्रशांत श्रेयस रस्त्याच्या बाजूला पडल्याने जखमी झाले. तर मागून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच-४३-वाय-७७४०) पूनम यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नशिराबाद पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक राहुल वाघ, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळावर जाऊन पूनम जैन यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
पुढीसल स्लाईडवर वाचा, डाेळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, ट्रकच्या चाकाखाली अाल्याने वृद्धाचा मृत्यू...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended