आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-  राष्ट्रीय महामार्गावर कालिंकामाता चौफुलीजवळ गेल्या बुधवारी सायंकाळी ट्रक दुचाकीत झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचार घेताना शनिवारी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयानंतर खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.  

अयोध्यानगरातील समाधान ऊर्फ सनी बळीराम खरोटे (वय २१) याच्या दुचाकीचा (क्र. एमएच-१९/बीबी-२५९३) आणि ट्रक (क्र. एमएच-१८/एम-५७०१) यांच्यात कालिंकामाता चौफुलीजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर समाधानला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्या वेळी मित्रांनी चांगलाच गोंधळ घातला होता. 

कुटुंबीयांचा आक्रोश 
समाधानच्या मृत्यूची माहिती कळल्यानंतर कुटुंबीयांनी अाक्राेश केला. समाधान हा मनमिळाऊ स्वभावाचा हाेता. त्यामुळे त्याच्या मित्रांनीही अाक्राेश केला. समाधानचे वडील बळीराम खराेटे एमअायडीसीत एका कंपनीत कामाला जातात, तर लहान भाऊ शुभम हा सध्या दहावीची परीक्षा देत अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...