आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासोबत उपचारासाठी दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत-हमिदाबी. - Divya Marathi
मृत-हमिदाबी.
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील आयुध निर्माणीच्या गेटजवळ मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मुलासोबत उपचारासाठी जाणारी वरणगाव शहरातील महिला जागीच ठार झाली. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यात हा अपघात झाला.  
   
सम्राटनगरातील रहिवासी शेख अफसर शेख इस्माईल हा त्याची आई हमीदाबी शेख इस्माईल (५५) यांना दुचाकीवर बसवून मुक्ताईनगरातील दवाखान्यात घेऊन जात होता. या प्रवासात आयुध निर्माणी गेटजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे हमीदाबी रस्त्यावर पडल्या. 
 
डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा दुचाकीचालक शेख अफसर हा जखमी झाला. त्याच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक दीपक लक्ष्मण नारायणकोंडा (३०, रा.चंद्रपूर) याने पळ काढला.  मात्र, मुक्ताईनगर पोलिसांनी त्याला ट्रकसह ताब्यात घेऊन वरणगाव पोलिसांकडे सोपवले. शेख अफसर शेख इस्माईल यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविराेधात गुन्हा दाखल झाला. मृत हमीदाबी यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार अाहे.  

पुढील स्लाइडवर वाचा, मुक्ताईनगरमधील अपघाताबाबत... 
बातम्या आणखी आहेत...