आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधेमुळे दोन गायी दगावल्या, राज्यात गुरं मालकांवर दाखल होणार पहिलाच गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल (जि.जळगाव) - ' विषबाधेमुळे दोन गायी दगावल्याने खळबळ' या मथड्या खाली दिव्यमराठीने २४ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिध्द करीत यावल शहरामधील मोकाट गुरांचा प्रश्न मांडत प्रशासनाला वेठीस घरले होते याची तात्काळ दखल घेत पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांनी २५ जानेवारी रोजी मोहिम राबवत थेट आठ मोकाट गुरं शेतकऱ्यांच्या मदतीने पकडली  होती व यातील चार मालकांवर आता थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
चारही गुरं मालकांना यावल न्यायालयाने तात्पुरत्या बंधपत्रकावर जामीन दिला असुन येत्या ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महालोक अदालत मध्ये त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे संकेत आहे.
 
शहरातील गंगानगर सह परिसरात २४ जानेवारीला चार गायींना विष बाधा झाल्याने अत्यावस्थ अवस्थेत आढळल्या होत्या त्यातील एका गायीचे प्राण वाचवण्यात आले होते. विषबाधा होवुन गायी मृत होण्याची शहरातील गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी घटना होती.
 
गाशी मयत झाल्या नंतर या मृत गायींचे मालक पुढे येत नव्हते तेव्हा  मोकाट फिरणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील गुरांचा बंदोबस्त पालिका व पोलिस प्रशासन करीत नाही असे सडेतोड वृत्त दिव्यमराठीने प्रसिध्द करीत प्रशासनाला वेठीस धरले होते.
 
 तेव्हा वृत्त झडकताचं पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांनी २५ जानेवारीला पोलिस उपनिरिक्षक अशोक आहिरे, हवालदार मुबारक तडवी, हवालदार गोरख पाटील यांचे पथक मोकाट गुरांना पकडण्या करीता नेमले व येथील फैजपुर रस्त्याला लागुन असलेल्या महाविद्यालयाच्या मागील बाजुस शेता परिसरात मोकाट फिरणाऱ्या आठ जनावरांनी शेतकऱ्यांच्या मदतीने पकडण्यात आले व त्यांचा बेवारस म्हणुन पंचानामा करीत त्यांना एका वाहनात टाकुन गोशाळेत रवाना करण्यात आले होते या कामी शेतकरी प्रमोद गडे, निलेश गडे, राहुल निंबाळकर, यशवंत फेगडे, प्रमोद नेमाडे, पी. टी. चोपडे, किशोर राणे, बाळु फेगडे, महेश गडे, संजय गडे, हेमराज फेगडे, दिवाकर तळेले आदी शेतकऱ्यांनी मदत केली होती.
 
मालकांवर गुन्हा दाखल.
गुरे गोशाळेत बेवारस म्हणुन पाठवल्याने  त्यांतील चार गुरांचे मालक यात विजयम मुलचंद पंडीत कुभारवाडा, सादिक शेख हनिफ बाबुजीपुरा, अख्तर रमजान तडवी आठवडे बाजार सईदपुरा, व अझर खान अरशफ खान बाबुजीपूरा यां चौघांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १८८ अन्वये आपल्या ताब्यातील गुरं दुसऱ्याच्या शेतात चारले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला. अटी शर्तीने मिळाला जामीन.

न्यायधिश ए.ए.के. शेख, व न्यायधिश धुर्वे यांनी या चौघ गुरं मालकांंना अटीशर्तीच्या आधीन राहुन तात्पुरत्या जामीनावर मुक्त केले आहे. पुन्हा जर त्यांची गुरं मोाकाट दिसली तर त्यांच्या विरूध्द कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे.

 
बातम्या आणखी आहेत...