आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातून पळालेल्या दोन मुली नाशिकमध्ये सापडल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुप्रीमकाॅलनी गेंदालाल मिल भागात राहणाऱ्या तसेच नूतन मराठा विद्यालयात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मुली शनिवारी शाळेत अाल्यानंतर काहीही सांगता निघून गेल्या हाेत्या. या मुली नाशिक येथे सापडल्या असून याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल अाहे.
 
एमअायडीसीतील सुप्रीम कॉलनी गेंदालाल मिल भागात राहणाऱ्या दाेन मुली नूतन मराठा विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत अाहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतरही या मुली घरी पाेहाेचल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. पाेलिस उपनिरीक्षक गिरधर निकम, विजय पाटील, नरेंद्र वारुळे अाणि जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे भटू नेरकर, ललित पाटील, रवी तायडे यांना तपासासाठी पाठवण्यात अाले होते. सुप्रीम काॅलनीतील विद्यार्थिनी रिक्षाने ये-जा करीत हाेती. पाेलिसांनी संबंधित रिक्षाचालकाची चाैकशी केली असता नाशिक येथे बाेलावले असल्याचे सांगितले. त्यानंतर तत्काळ पाेलिसांचे पथक रिक्षाचालक तरुणाला घेऊन नाशिक येथे पोहोचले. त्या ठिकाणी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांना जळगावात आणले. 
बातम्या आणखी आहेत...