आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा धरणात धुळ्याच्या दाेघा तरुणांचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - पर्यटनासाठी गिरणा धरणावर अालेल्या धुळे येथील दाेघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना साेमवारी दुपारी दाेन वाजेच्या सुमारास घडली.
 
धुळे येथील काही तरुण तरुणी पर्यटनासाठी गिरणा धरणावर अाले हाेते. परिसरात फिरत असताना उन्हामुळे यातील काही तरुण तरुणी धरणाच्या पाण्यात उतरले. या वेळी शेवाळावरून पाय घसरल्याने सलमान वाहिद खान (वय २२) हा पाण्यात पडला. युसूफ शेख (वय २३) याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाेघांनाही पाेहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार इतर तरुणांच्या लक्षात अाल्याने त्यांनी अारडाअाेरड केली. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दाेघेही खाेल पाण्यात गेल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्याने अग्निशमनच्या जवानांनी तब्बल तीन तासांच्या शाेधकार्यानंतर मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शाेधकामात मच्छीमार नरेंद्र सैंदाणे, विठ्ठल पवार यांनी सहकार्य केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...