आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव- कुत्रे आडवे आल्याने दुचाकी अपघातात 2 तरुण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दुचाकीला कुत्रे अाडवे अाल्याने झालेल्या अपघातात बीएसएनएलचा कर्मचारी गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला अाहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. स्वातंत्र्य चाैकात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता हा अपघात झाला. 
 
बीएसएनएलचा कर्मचारी गाेपाल कैलास ठाकूर (वय २२, रा. गणेशवाडी) अाणि त्याचा मित्र प्रशांत ज्याेतीराम भाेई (वय २३, रा. शिवाजीनगर) हे दाेन्ही शुक्रवारी सकाळी कामानिमित्ताने भास्कर मार्केटमध्ये गेले हाेते. काम संपल्यानंतर सकाळी ते दुचाकीने परत बीएसएनएल कार्यालयाकडे येत हाेते. स्वातंत्र्य चाैकात त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रे अाडवे अाल्याने दाेन्ही लांब फेकले गेले. त्यात गाेपाल ठाकूर याच्या चेहऱ्यावर डाेक्याला दुखापत झाली अाहे. तर प्रशांतच्या हाताला अाणि पायाला दुखापत झाली अाहे. नागरिकांनी दाेघांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
बातम्या आणखी आहेत...