आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीएससीने मागवले १४६ जागांसाठी अर्ज, जाहिरात प्रसिद्ध, सप्टेंबरपर्यंत मुदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- यूपीएससीच्या (केंद्रीय लोकसेवा आयोग) विविध १४६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्येष्ठ अधिव्याख्याता, सहायक संचालक, ज्येष्ठ वैज्ञानिक अधिकारी, विशेषज्ञ, सहसंचालक आणि सहायक अभियंत्यांची रिक्त पदे असून, सर्वाधिक १०६ पदे विशेषज्ञांची आहेत.

केंद्रीय मंत्रालयांच्या अंतर्गत येणारे विभाग आणि चंदिगड येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या या जागा आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी विविध केंद्रे किंवा महाविद्यालयातील भूलशास्त्र विभागात विशेषज्ञ म्हणून ७५ जागा आहेत. ४० वयोमर्यादेपर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. याच विभागात मेडिसिन बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रत्येकी एक जागा आहे. संरक्षण मंत्रालयातील केमिकल इंजिनिअरिंग विभागात सहायक अभियंत्यांच्या पदांसाठी ३० वयोमर्यादा ठरवली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्रौढ शिक्षणाचे सहसंचालकपदही रिक्त आहे. हे एकमेव पद असून, त्यासाठी ५० वयोमर्यादा आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत गंभीर गैरव्यवहार अन्वेषण कार्यालयात सहायक संचालकांच्या दोन जागा आहेत. ३० वर्षांचे युवक अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्रालयात शिल्पकाराची एक, मुंबई येथील शिपिंग विभागात सहायक संचालकाची एक जागा आहे. दोन्ही पदांसाठी ४० वयोमर्यादा आहे. चंदिगडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयासाठी ज्येष्ठ अधिव्याख्यात्यांची १७ पदे आहेत. त्यापैकी भूलशास्त्रज्ञाच्या जागा आहेत. फिजिओलॉजी, बालरोग विभागांच्या उर्वरित जागा आहेत. ५३ वयोमर्यादेपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. विमानविद्या विभागात ज्येष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
बातम्या आणखी आहेत...