आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय व्यायामशाळा जागेवर, २०० हाॅकर्सचे करणार पुनर्वसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- अाग्राराेडवरील फेरीवाल्यांची गर्दी कमी करण्याची तयारी मनपाने सुरू केली अाहे त्यासाठी पांझरा नदीकिनारी असलेल्या विजय व्यायामशाळेसमाेरील जागेचा पर्याय सुचवण्यात अाला अाहे. २०० हॉकर्सचे या जागेवर पुनर्वसन केले जाईल अाग्राराेडला ‘नाे हाॅकर्स झाेनचा दर्जा देण्यात येणार अाहे. या मार्गावर हातगाडी दिसणार नाही, याची दक्षता महापालिकेसह वाहतूक शाखेकडून घेण्यात येईल. त्यातून हा मार्ग किमान वाहतुकीसाठी माेकळा हाेणार अाहे.
शहरात आग्रा राेडवर फेरीवाल्याची संख्या सर्वाधिक अाहे. या फेरीवाल्यांना हटवण्याची कामगिरी अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांनी केली हाेती. त्यावेळी महिनाभराच्या कालावधीत काेरताही हाॅकर अाग्राराेडवर फिरकला नाही. मात्र त्यानंतर पुनहा हाॅकर्सची गर्दी वाढली. पुन्हा वाहतुकीची काेंडी व्हायला लागली अाहे.त्यावर अाता थेट उपाय काढण्याचे काम सुरू झाले अाहे. त्यासाठी नाेंदणीकृत हाकर्सना पांझरा नदीच्या काठावर असलेल्या विजय व्यायामशाळेच्या जागेवर हलवण्यात येणार अाहे. व्यायामशाळेची माेकळी जागा कधीपासून केवळ पडून अाहे. महापालिकेच्या ताब्यात ही जागा अाहे. त्याचबराेबर बाजारपेठेला लागून ही जागा असल्यामुळे हाॅकर्स ग्राहकांनाही त्याचा फायदा हाषरार अाहे. महात्मा गांधी चौकापासून ते पाचकंदीलपर्यंत कपडे, भाजीपाला, मसाले, फळ विक्रेते, चप्पल, सौंदर्यप्रसाधने, बांगड्या, कपबशी, कटलरी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना या व्यायामशाळेजवळ हलविले जाईल. फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा देण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊन आग्रा रोड परिसरात ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करावे, असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे जागांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

आग्रा रस्त्याचे दोन भागात विभाजन
सर्वफेरीवाल्यांना एकाच ठिकाणी सामावून घेता येईल इतकी मोठी जागा महापालिकेकडे नाही. त्यामुळे शहर पोलिस चौकीपासून पाचकंदीलपर्यंतच्या व्यावसायिकांना बारापत्थर जवळील महापालिकेच्या शाळेजवळ तर पोलिस चौकीपासून गांधी पुतळ्यापर्यंतच्या व्यावसायिकांना विजय व्यायामशाळेजवळ पटांगण पाटबाजाराजवळ जागा देण्याचा विचार सुरू आहे.

व्यायामशाळा, पाटबाजाराची पाहणी
शहरातीलआग्रा रोडवरील फेरीवाल्यांना विजय व्यायामशाळेसमोरील शासकीय जागा देण्याचा विचार पुढे आला आहे. त्याचबरोबर पाटबाजाराचीही जागा देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी या जागेचे माेजमाप करण्यात अाले आहे. या ठिकाणी किती फेरीवाल्यांना सामावून घेता येऊ शकते याचा अंदाज घेण्यात येत आहे. त्यानंतरच इतर जागाचा पर्याय पुढे केला जाईल.
पांझरा नदीकाठी असलेल्या याच मोकळ्या जागेचा पर्याय शोधला आहे.

चारशे,पाचशे फेरीवाले
आग्रारस्त्यावर महात्मा गांधी चौक ते पाचकंदीलपर्यंत साधारणपणे चारशे ते पाचशे फेरीवाले आहेत. संपूर्ण शहरात साधारणपणे १३०० फेरीवाला व्यावसायिकांची नोंदणी करण्यात अाली आहे. अिधकृत नोंदणीधारकांनाच या जागेत समाविष्ट केले जाईल. देवपूरकडून येणारे नागरिक याच ठिकाणाहून दोन बाजूला वळतात. त्याचा फायदा हॉकर्सना होऊ शकतो. त्याचबरोबर वाहने लावायलाही जागा आहे.
बातम्या आणखी आहेत...