जळगाव- संसदेत नुकतीच शेतकरी अात्महत्याबाबत अाकडेवारी जाहीर करण्यात अाली अाहे. यातील ८५ टक्के महाराष्ट्रातील शेतकरी अाहेत ही अापल्या राज्यासाठी लांच्छनास्पद बाब अाहे. राज्य सरकारने या गंभीर प्रश्नी शे-सव्वाशे जाणकारांची सर्वसमावेशक समिती नेमावी, अशी मागणी अाठ दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून अापण करणार अाहाेत, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी गुरुवारी दिली.
शेतकरी कर्जमाफीबाबत वारंवार अध्यादेश बदलल्याने संभ्रम निर्माण हाेत अाहे. सरकारी अधिकारी व बँक कर्मचारी सहकार्य करत नाहीत. तसेच सरकारचा हा चांगला निर्णय भाजप कार्यकर्तेही शेतकऱ्यांपर्यंत अाक्रमकपणे पाेहोचवत नसल्याने लाेकांना कर्जमाफी नेमकी काेणाला मिळेल हेच समजत नाही, अशी खंतही मेटेंनी व्यक्त केली.
‘राज्याने कर्जमाफीसाठी घेतलेला निर्णय चांगला अाहे. सरकारने मागील तीन वर्षांचा विचार केला अाहे. मात्र चालू वर्षातील थकबाकीदारांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी थकबाकीदार ३० जून २०१६ ऐवजी ३० जून २०१७ निकष करायला हवे. त्यामुळे चालू वर्षातील थकबाकीदारांनाही कर्जमाफीचा फायदा हाेईल,’ असे मेेटे यांनी सांगितले.
शिवसंग्राम संघटनेने सामाजिक कार्यासाेबत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी संपूर्ण राज्याचा दाैरा करण्यात येत अाहे. नागपूर, अमरावती, वाशी, अकाेला, बुलडाणा या ठिकाणचे दाैरे झाले असून जळगावनंतर नंदुरबार, नाशिक, पालघर असा दाैरा करण्यात येणार अाहे. या दाैऱ्यात कर्जमाफी, जीएसटी व समृद्धी महामार्ग याबाबत शेतकरी, व्यापारी व शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचे मेटे यांनी या वेळी सांगितले.
कॅबिनेटमध्ये स्थान मिळावे...
महायुतीतील सर्व घटक पक्षांना भाजपने सत्तेत स्थान दिले अाहे. मात्र, अद्याप शिवसंग्राम पक्षाला स्थान दिलेले नाही. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांच्या कानावर याबाबत टाकले अाहे. पक्षाला लेखी करारानुसार अामच्या पक्षालाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळायला हवे ही अपेक्षा मेटे यांनी या वेळी व्यक्त केली. सामाजिक पातळीवर पक्षाने अापली ताकद अनुभवली अाहे. अाता राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी अागामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला अाहे. भारतीय संग्राम परिषदेच्या बॅनरवर जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे मेटे यां नी सांगितले.