आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीपेठेमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या मद्यपीला चाेप, पाया पडल्याने वादावर पडदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मद्यधुंद तरुणाने नवीपेठेत साेमवारी दुपारी १.४५ वाजता महिलेची छेड काढली. महिलेने अारडाअाेरड केल्यानंतर अाजूबाजूला असलेल्या तरुणांनी त्या मद्यपी तरुणाला चांगलाच चाेप दिला. महिलेचा पाया पडल्याने वादावर पडदा पडला. 
 
एक महिला गाेलाणी मार्केटकडून बँक स्ट्रीटच्या मागच्या गल्लीतून जात हाेती. या वेळी तिच्या मागून अालेल्या तरुणाने तिला हात लावला. पहिल्यांदा चुकून लागला असेल, असे वाटल्याने त्या महिलेने साेडून दिले. मात्र, काहीच केल्याने त्याने पुन्हा हात लावला. त्यामुळे घाबरून जाऊन महिलेने अारडाअाेरड केली. या वेळी अाजूबाजूला उभ्या असलेल्या तरुणांनी मद्यधुंद तरुणाला चांगलाच चाेप दिला. त्यानंतर महिलेच्या पाया पडण्यास सांगितल्यानंतर या वादावर पडदा पडला. महिलेची छेड काढणारा ताे तरुण ममुराबाद येथील हाेता. त्याने त्याचे नाव मात्र सांगितले नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...