आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्टमध्ये नगरसेवकांची घुसखाेरी; साहेबांनाही रांगेत उभे राहण्याचा नियम करा, नागरिकांची अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील रस्ते, गटारी, साफसफाई या समस्यांमध्ये सतरा मजलीतील नादुरुस्त लिफ्टने भर घातली अाहे. महापालिकेतील सहा लिफ्ट पैकी चार लिफ्ट नेहमी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत अाहे. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी नगरसेवक हे रांगेत उभे राहता थेट लिफ्टमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे त्यांना नागरिकांना काय त्रास हाेताेय त्यांना जाणीव हाेत नाही. त्यामुळे साहेबांनाही रांगेत उभे राहण्याचा नियम लागू करा म्हणजे परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा अनेक त्रस्त नागरिकांनी ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केली. 

 

स्थानिक स्वराज्य संस्थेची सगळ्यात उंच इमारत म्हणून जळगाव महापालिकेच्या इमारतीचा नावलाैकिक अाहे; परंतु अाता ही उंच इमारतच कर्मचारी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत अाहे. पालिकेच्या सतराव्या मजल्यापर्यंत पाेहचण्यासाठी एकमेव साधन असलेल्या लिफ्टची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम अाहे. सहा पैकी एक लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अाहे. गेल्या वर्षी एका लिफ्टचा अपघात झाल्याने ती कार्यान्वित करण्यासंदर्भात अादेश प्राप्त झालेले नाहीत. उर्वरित चार लिफ्ट पैकी दाेन लिफ्ट सतत बंद सुरू राहतात. त्यामुळे दाेन लिफ्टवर ताण पडताे. त्यातही अधिक भार राहिल्यास त्यातील एक लिफ्ट केव्हा बंद पडेल याचा अंदाज नसताे. ही समस्या एका दिवसाची नसून दरराेजची असून ती साेडविण्यात यावी अशी मागणी हाेत अाहे. 

 


सगळ्यांसाठी एकच नियम हवा : बंद लिफ्टविषयी नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत अाहेत. अत्यंत किरकाेळ कामासाठी येणाऱ्या नागरिकांना लिफ्टसाठी रांगा लावाव्या लागत असल्याने बऱ्याचदा कामे हाेत नसल्याची तक्रार अाहे. तसेच अनेकदा रांगा लागलेल्या असतात; परंतु वरिष्ठ अधिकार अाले म्हणजे रांगेतील नागरिकांना थांबवून त्या साहेबांना विशेष ट्रिटमेंट दिली जाते. तर नगरसेवकांसाेबत अालेले कार्यकर्तेदेखील रांगेतील लाेकांना बाजूला करून जागा मिळवतात. त्यामुळे सगळ्यांना एकच नियम लावल्यास प्रत्येकाला काय त्रास सहन करावा लागताे याची जाणीव हाेईल, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहेत. 


१७ वर्षांपासूनच्या सहा लिफ्ट कालबाह्य 
सतरा मजलीतील सहा लिफ्ट कालबाह्य झाल्या अाहेत. वारंवार दुरुस्तीमुळे किमान अाजपर्यंत त्या सुरू अाहेत; परंतु केव्हाही माेठी दुर्घटना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी लिफ्टच्या दुरुस्तीसाठी सभेत विषय मांडण्यात अाला हाेता; परंतु त्यावर हाेणारा खर्च अधिक असल्याने या कामाकडे दुर्लक्ष झाले अाहे. सत्ताधारी प्रशासनातील वरिष्ठांनी याकडे लक्ष दिल्यास नागरिकांची माेठी गैरसाेय टळेल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...