आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंवर्धनासाठी ५०० गावांत ४० जलदूत करतील प्रबाेधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जलसंवर्धन वेगाने व्हावे यासाठी नाबार्डने अभियान हाती घेतले अाहे. यासाठी ५०० गावांची निवड करण्यात अाली. या गावांमध्ये प्रबाेधन व्हावे म्हणून ४० जलदूतांना प्रशिक्षण देण्यात अाले. त्यांचे २० चमू तयार करण्यात अाले अाहेत. एका संघात दाेन जणांचा समावेश राहील. त्यांना प्रशिीणही देण्यात अाले अाहे. याचबराेबर जलपुनर्भरणाची माेहीमही हाती घ्यायची तयारी सुरू झाली अाहे. 
 
‘पाणी हेच जीवन’ या ब्रीदवाक्यानुसार ही मोहीम हाेत अाहे. मे जून या कालावधीत जलअभियान राबविले जाईल. या मोहिमेला मूर्त स्वरूप यावे, यासाठी जलदूत तयार केले अाहेत. ४० जलदूतांची निवड झाली अाहे. एका चमूत दोन जलदूत याप्रमाणे २० चमू गठीत झाले. एक चमू २५ गावांना भेट देईल. यातून एक लाख लोकांपर्यंत जलदूत पोहाेचतील. गावात गेल्यानंतर सरपंच, सदस्य, महिला बचतगट, शेतकरी गट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका यांच्यासह गृहिणी, ग्रामस्थांशी संवाद साधला जाईल. त्यांना जलसंवर्धन, जलपुनर्भरण, जलव्यवस्थापन याविषयीचे महत्त्व सांगितले जाईल. या मोहिमेतून एक कोटीहून अधिक लोकांना जलसंवर्धनाची शपथ देण्यात येईल. जलदूतांचे काम परिणामकारक व्हावे यासाठी नाबार्डतर्फे जलदूतांना अँड्राॅइड मोबाइल देण्यात येणार आहेत. या मोबाइलमध्ये मोबाइल अॅप्लिकेशन अपलोड करावे लागेल. यामुळे जलदूतांना गावागावात भेट देताना गावाचे नाव, भेट घेतलेल्या व्यक्तींची माहिती, बैठक भेटीची क्षणचित्रे, गावातील पाण्याच्या संवर्धनासंदर्भात असलेली स्थिती अॅप्लिकेशनवर अपलोड करावी लागेल. हा सर्व डाटा नाबार्डच्या संकेतस्थळावर दिसेल. यामुळे जलदूतांच्या कामावरदेखील नियंत्रण राहणार असून, कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. नाबार्डने नियुक्त केलेले जलदूत या गावांत कार्यक्रम घेतील. ते पूर्ण दिवस त्या गावांत राहून युवा स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि स्त्रिया यांच्यासमवेत बैठका घेतील. त्याचबरोबर गावफेरी, गाव नकाशा या उपक्रमांचे आणि कृषी जलसंवादही होणार आहे. 

भूजलपातळीत घट 
जिल्ह्यातदरवर्षी सरासरीच्या जवळपास पाऊस होतो. पावसाचा थेंब अन‌् थेंब जिरवण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे भूजलपातळीत घट होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळीच जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

पावसाचे पाणी जिरवणे महत्त्वाचे 
पावसाचेछतावर पडणारे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवला पाहिजे. शहरात हा प्रयोग राबवणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता करात सूट देण्यात येते. ग्रामीण भागातील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास त्यांनाही मालमत्ता करात सूट दिली गेली पाहिजे. तसे झाल्यास ग्रामीण भागात जलपुनर्भरणाचे प्रमाण वाढू शकते. 

अभियानात सहभाग नोंदवा 
^याजलअभियानात ग्रामपंचायतींसमवेत गावातील शेतकरी समूह, महिला बचतगट, उत्पादक कंपन्या, पतसंस्था आणि अन्य स्थानिक संस्थांचे साहाय्य आणि सहभाग मिळण्याची अपेक्षा आहे. शासकीय यंत्रणा ग्रामस्थांनी या अभियानात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. -विवेकपाटील, महाव्यवस्थापक, नाबार्ड 
 
 
बातम्या आणखी आहेत...