आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेणाला काहीही म्हणू द्या, सरकारला धाेका नाही : गिरीश महाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य सरकारला काेणताही धाेका नसून सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. निवडणूक केव्हाही लागली तरी कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे, असे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा उद्देश हाेता. त्यामुळे काेणाला काहीही म्हणू द्या, राजकीय पक्षांना कितीही वल्गना करू द्या, मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केला. 
 
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यवधी निवडणुकीची शक्यता मंगळवारी व्यक्त केली हाेती. त्यानंतर बुधवारी तापी महामंडळांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा अाढावा घेण्यासाठी मंत्री महाजन यांनी जळगावात बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना राज्यात मध्यवधी निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळली. ते म्हणाले, ‘सरकारच्या याेजना जनतेपर्यंत पाेहचवल्या पाहिजे. निवडणूक अाज लागली काय अाणि उद्या काय? अापण तयारीत असायला हवे, असे मुख्यमंत्र्यांच्या बाेलण्याचा उद्देश हाेता. 
 
हजार काेटींची मागणी : दुष्काळीअात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी हजार काेटींची मागणी केली अाहे. याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांकडे हजार काेटींची अतिरिक्त मागणी केली असून त्याला संमती दर्शवली अाहेे. सिंचन शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले जात अाहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ठिंबक सिंचनचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू अाहेत. 
 
बलून बंधाऱ्यांची निविदा १५ दिवसांत 
गिरणानदीवरील सात बलून बंधाऱ्यांच्या निविदा प्रक्रियेला पंधरा दिवसांत सुरुवात हाेईल. यामुळे गिरणा नदीवर ९० किलाेमीटरपर्यंत पाण्याचा साठा राहणार अाहे. या बंधाऱ्यांसाठी सुमारे ६५० काेटींचा निधी मिळणार अाहे. यासाेबत जिल्ह्यातील निम्न तापी, बाेदवड, शेळगाव बॅरेज, वाघूर या प्रकल्पांसाठीही निधीची अडचण दूर हाेईल, असे महाजन यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...