आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे - दबाव अाणायला अाम्ही गुंड अाहाेत का; नगरसेवक संतप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेचे लेखाधिकारी म्हणतात माझ्यावर दबाव येताे. त्यांच्यावर काेण दबाव टाकताेय. नगरसेवकांकडे निर्देश दिसतात. नगरसेवकांची अापली प्रतिष्ठा अाहे. दबाव अाणायला अाम्ही काय गुंड अाहाेत का, असा संताप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केला. दबाव अाणणाऱ्यांची नावे लेखाधिकाऱ्यांनी तत्परतेने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी संबंधित लेखाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस द्यावी, अशी सूचना स्थायी समिती सभापतींनी उपायुक्त रवींद्र जाधव यांना दिली. 
 
 
एकवीरादेवी यात्रेचा ठेका मंजूर करण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीची तातडीची विशेष सभा मंगळवारी झाली. या वेळी सभापती कैलास चौधरी, उपायुक्त रवींद्र जाधव, सचिव मनोज वाघ समिती सदस्य उपस्थित होते. या वेळी लेखाधिकारी दीपकांत वाघ यांनी नियमबाह्य काम करण्यासाठी नगरसेवकांकडून दबाव येताे. त्यामुळे काम करताना चुका होण्याची भीती त्यांनी वर्तविली हाेती. त्यावर हा अतिरिक्त पदभार काढून घ्यावा, असे पत्रही प्रशासनाला दिले. यावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. या वेळी सभेत बाेलताना इस्माईल पठाण यांनी म्हटले की, लेखाधिकारी वाघ यांच्यावर दबाव आणणाऱ्या नगरसेवकांची नावे त्यांनी जाहीर करावी. मायादेवी परदेशी यांनीही तीच मागणी केली.
 
लेखाधिकारी वाघ यांच्या अाराेपांमुळे नगरसेवकांबद्दल गैरसमज निर्माण होतील. नगरसेवकांना अापली प्रतिष्ठा असते. ते काही गुंड नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर दबाव काेण अाणताे, त्यांची नावे जाहीर करावीच. त्याशिवाय सत्यता पुढे येणार नाही, असे नगरसेवक म्हणाले. इस्माईल पठाण यांनी मनपा प्रशासनाने यात्रेत नागरिकांसाठी पाण्याची सुविधा द्यावी दुकानाचे दर फलक, अधिकाऱ्यांचे नंबर द्यावेत अशी सूचना केली. या चर्चेनंतर कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. मनपा उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हा ठेका देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 
 
दुसऱ्यांदा झाली सभा... 
एकाच विषयावर दुसऱ्यांदा सभा घेण्याची वेळ स्थायी समितीवर आली. प्रारंभी सभेनंतर लिलावही झाला होता; परंतु त्याला मंजुरी देण्यासाठी विशेष सभा झाली. ठेक्याच्या पावत्या मात्र उशिरा देण्यात आल्या. 
 
लेखाधिकाऱ्यांना नाेटीस 
लेखाधिकारीदीपकांत वाघ यांनी केलेल्या अाराेपांवर सभापती कैलास चौधरी यांनी या प्रकरणी त्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी सूचना केली. त्याचबराेबर याची सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी, असेही सांगितले. यावर उपायुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले की आयुक्तांनी त्यांना अगोदरच नोटीस दिलेली आहे. 
 
यात्रा ठेक्याची निविदा का काढली नाही? 
एकवीरा देवी यात्रेच्या विषयावर बोलताना साबीर अली यांनी यात्रा लिलावासाठी ई-टेंडर प्रक्रिया का राबविली नाही याबाबत विचारणा केली. त्यावर सहायक अायुक्त त्र्यंबक कांबळे यांनी ई-टेंडर प्रक्रियेसाठी कालावधी कमी असल्याचे सांगितले. त्यावर साबीर अली यांनी प्रशासनाला यात्रेच्या लिलावाची अगोदरपासून माहिती असताना उशीर कसा झाला. दरवेळी काहीतरी कारणे देऊन दिरंगाई करता कार्योत्तर मंजुरी घेणार आहे, असे सांगता. तरीही ही प्रक्रिया उशिराने होत आहे. यावरही नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...