आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौर काेल्हेंच्या हस्ते शिवसेना जि.प. सदस्यांचा सत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे गुरुवारी शिवसेना कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार अायाेजित करण्यात अाला हाेता. या कार्यक्रमाला मनसेचे उपमहापाैर ललित काेल्हे यांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे, तर उपमहापाैर ललित काेल्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 
 
शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या गैरहजेरीत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र तथा पाळधी-बांभाेरी गटातील जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, म्हसावद-बाेरनार गटातील जिल्हा परिषद सदस्य पवन साेनवणे यांचा या वेळी सत्कार करण्यात अाला. 
 
शिवसेना महानगर शाखेतर्फे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात अाला. शिवसेनेच्या एकाही प्रमुख नेत्यांची उपस्थिती नसलेल्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपमहापाैर काेल्हेंची हजेरी शहरात चर्चेचा विषय ठरली. 

सत्कार समारंभास माजी उपमहापाैर सुनील महाजन हे देखील उपस्थित हाेते. तसेच कार्यक्रमाला शिवसेना महानगरप्रमुख गणेश सोनवणे, उपजिल्हाप्रमुख चिंतामण जैतकर, उपमहानगरप्रमुख मानसिंग सोनवणे, सोहम विसपुते, महिला आघाडीच्या शोभा चौधरी, जितेंद्र गवळी, मोहन यादव, नवलसिंग पाटील, नितीन राजपूत, स्वप्निल सोनवणे, पंकज राठोड, हेमराज परदेशी, गणेश सपकाळे उपस्थित हाेते. कोल्हे आणि महाजन यांच्या उपस्थितीमुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली. 
बातम्या आणखी आहेत...