आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे वनक्षेत्रात 5 बिबट्यांसह चिंकारा प्रजातीच्या 137 हरणांचा वावर, वाचा वन्यजीव आणि संख्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - वन विभागातर्फे धुळे वनपरिक्षेत्रात वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुद्ध पाैर्णिमेला रात्रभर जागून वन्यजीवांची गणना केली. या गणनेत धुळे वनक्षेत्रात पाच बिबट्यांसह एकूण ५८७ वन्यजीव आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक १३७ चिंकारा जातीच्या हरणांचा समावेश आहे. गणनेचा अहवाल वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पाैर्णिमेला वन्यजीवांंची गणना केली जाते. त्यानुसार धुळे वनपरिक्षेत्रात येणाऱ्या शहराला लागून असलेल्या लळिंग कुरण, गरताड, बोरविहीर, पुरमेपाडा, नांद्रे, पिंपरखेडा आदी भागात वन्यजीवांची गणना करण्यात आली. गणनेत विविध ठिकाणी एकूण ५८७ वन्यजीव आढळून आले. वनपरिक्षेत्रातील चार ठिकाणी केलेल्या पाहणीत पाच बिबटे आढळून आले आहेत. त्यापैकी दोन बिबटे लळिंग कुरणातील हरण्या तलाव गारबर्डी तलावाजवळ पाण्याच्या शाेधात आले असताना दिसून आले. याशिवाय पुरमेपाडा वनहद्दीत एक तर नांद्रे पिंपरखेडा वनक्षेत्रात दोन बिबटे आढळून आले आहेत. त्याची नोंद वन विभागाने घेतली आहे. याशिवाय इतर परिसरात बिबट्या आढळून येतो का याची पाहणी वन विभागाने केली. मात्र, सकाळपर्यंत इतर भागात कोणताही बिबट्या आढळून आला नाही. 
 
वनपरिक्षेत्रात सर्वाधिक चिंकारा जातीची हरणे आढळून आली. याशिवाय रानडुक्कर, सायाळ, मोर, ससे, तरस, भेकर, रानमांजरही दिसून आले. वन विभागात आढळलेले वन्यजीव, ठिकाण त्यांच्या संख्येची नोंद घेण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. पाटील यांच्यासह वनपाल के. डी. देवरे, बी. एस. भामरे, व्ही. पी. पवार, पी. जी. पाटील, एम. ओ. पाटील, वनरक्षक के. सी. साळुंके, एम. जी. बोरसे, बी. बी. पाटील, एस. सी. सोनार, डी. आर. भामरे, झेड. एम. बाविस्कर, डी. एम. पाटील, डी. बी. बागुल, ई. आर. सूर्यवंशी, व्ही. डी. कांबळे, बी. बी. पाटील, एम. सी. सोनार यांच्या पथकाने वन्यजीवांची गणना केली, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. 
^वन्यजीव गणनेसाठीआधीपासून नियोजन करण्यात अाले होते. नियोजनानुसार वनहद्दीत रात्रभर सुरक्षित स्थळी बसून गणना करण्यात आली. वनहद्दीतील शांतता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेण्यात आली. पाहणीत पाच बिबटे इतर वन्यजीव आढळले आहेत. त्याचा अहवाल आता वरिष्ठांना सादर केला आहे.
-एस.आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी,धुळे. 
 
पाहणीचा अहवाल वरिष्ठांकडे अधिकाऱ्यांचे प्रयत्न 
वन्यजीवांची गणना करण्यासाठी ठिकठिकाणी मचाण बांधण्यात आले होते. या मचाणावर बुद्ध पाैर्णिमेला सायंकाळी सहापासून पहाटे सहापर्यंत वनाधिकारी कर्मचारी बसून होते. गणनेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले होते. वन्यजीव दिसताच त्यांची नोंद घेतली जात होती. यानंतर दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन
वन्यजीवांची नोंद केली. 
 
वन्यजीव आणि संख्या 
वन्यजीवगणनेत सर्वाधिक चिंकारा जातीचे हरणे अाढळून आले अाहेत. पाच ठिकाणी केलेल्या गणनेमध्ये एकूण १३७ लहान मोठे चिंकारा जातीचे हरणे अाढळून आले. त्या खालोखाल १३३ मोर, ११२ रानडुक्कर, सुमारे ९४ ससे, विविध ठिकाणी आढळून आलेले सुमारे ४० सायाळ, ३६ भेकर एकूण २५ रानमांजर आढळून आल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...