आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंक्शनवरील प्लॅटफॉर्मची उंची 17 सेंटिमीटर वाढणार, अपघातांचे प्रमाण होणार कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मध्य रेल्वेच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफाॅर्मची उंची समान ठेवण्याचे नियाेजन रेल्वे प्रशासनाने केले अाहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावरील सर्वच प्लॅटफाॅर्मची उंची वाढवली जाणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तयार केला अाहे. सध्या ६७ सेमी असलेली प्लॅटफॉर्मची उंची आता ८४ सेमी केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेत चढताना तसेच उतरताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करता येईल. 
 
भुसावळ रेल्वे स्थानक जंक्शन स्थानक अाहे. येथे दरराेज ३०० पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा हाेते. रेल्वे गाड्यांमध्ये चढण्याउतरण्यासाठी सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करता येते. मात्र, काही प्लॅटफॉर्मची उंची कमी तर काही ठिकाणी उंची अधिक असल्याची स्थिती आहे. त्यामुळे सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची एकसमान करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफाॅर्मची उंची ८४ सेमी असणे गरजेचे आहे. मात्र, भुसावळातील प्लॅटफाॅर्म ६७ सेंमी उंचीचे आहेत. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मची उंची १७ सेमीने वाढवली जणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
विशिष्ट टाइल्स बसवणार : रेल्वेनेप्रवास करणाऱ्या प्रज्ञाचक्षू बांधवांना प्लॅटफाॅर्म संपण्याची चाहूल लागावी यासाठी प्लॅटफाॅर्मवरील काही अंतरापर्यंत विशिष्ट प्रकारच्या टाइल्स लावल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रज्ञाचक्षू प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर चालताना सोबत असलेल्या काठीमुळे प्लॅटफॉर्मची लांबी संपल्याची जाणीव होऊ शकेल. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. 
 
लांबीदेखील वाढवणार 
जंक्शनवरील प्लॅटफॉर्म आणि ची लांबी ६०० मीटर आहे. त्यामुळे २४ डब्यांची गाडी या प्लॅटफॉर्मवर योग्य प्रमाणात लागते. मात्र, २४ पेक्षा एक किंवा दोन वाढीव डबे असल्यास या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची अडचण होते. लांबी कमी असल्याने काही लांबपल्याच्या गाड्यांचा एक डबा प्लॅटफॉर्मबाहेर थांबतो. गाेरखपूर, गितांजली, पुष्पक या पाच गाड्यांचा प्रत्येकी एक डबा प्लॅटफाॅर्मच्या खाली थांबतो. त्यामुळे चारही प्लॅटफाॅमची लांबी ६० ते ९० मीटरने वाढवली जाणार अाहे. याबाबत तत्परतेने हालचाली केल्या जाणार आहेत. 
सध्या भुसावळ स्थानकावरील फलाटांची उंची ६७ सेंमी आहे. 
बातम्या आणखी आहेत...