आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूची दुकाने, बिअरबार वाचवण्यासाठी धडपड, 13 दुकाने आठवड्यापासून पडली आहेत बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- पालिकेने शहरातून गेलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गाचा ताबा घ्यावा. यामुळे बंद झालेले देशी, विदेशी दारूची दुकाने आणि बियरबार व्यावसायिकांवर ओढवलेला बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व दारु, बिअर विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. याचा फटका शहरातील सर्व १३ व्यवसायीकांना बसला. या व्यावसायीकांनी शुक्रवारी पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांची भेट घेत निवेदन दिले. त्यात मार्च २००१च्या शासन परिपत्रकानुसार शहरातून गेलेल्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गाची देखभाल दुरूस्ती पालिकेकडे आहे. मात्र, पालिकेने अद्याप कायदेशिर पद्धतीने या रस्त्याचा ताबा घेतलेला नाही. परिणामी हा रस्ता राजमार्ग प्राधिकरणाकडे आहे.
 
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या रस्त्याच्या ५०० मीटर अंतरावरील १३ दारु-बिअर विक्रीची दुकाने बंद पडली आहे. यामुळे व्यावसायीक, कामगार इतर धंदेवाईकांवर बेरोजगारी ओढवली आहे. पालिकेने राज्यमार्गाचे स्वत:कडे हस्तांतर केल्यास ही वेळ टळेल, असे व्यावसायीकांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले. आता पालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
 रावेरमध्ये दारूच्या अवैध विक्रीची युवा सेनेची ओरड 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने एप्रिलपासून महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील पब, परमिट रूम, बिअरबार, विदेशी दारूची दुकाने बंद झाली आहेत. तरीही तालुक्यात काही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने तत्काळ चौकशी कारवाई करावी, अशी मागणी शुक्रवारी युवासेनेने पोलिस निरीक्षक कैलास काळे यांच्याकडे केली.युवासेनेचे अविनाश पाटील, प्रवीण पंडित, संजय पाटील, राकेश घोरपडे, उमेश मिस्तरी, जयेश पाटील, चेतन कदम, प्रवीण मोरे, रवींद्र पाटील, गोकुळ पाटील, किशोर धनगर, नीलेश पाटील, निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यात अवैध दारू विक्री सुरू असली तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ हप्ते वसुलीत गुंग असल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...