आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडवादिगर, भानखेड्यातील गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त, भुसावळ तालुका पोलिसांची धडक मोहीम सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापी काठावरील गावठी दारूच्या भट्ट्या नष्ट करताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
तापी काठावरील गावठी दारूच्या भट्ट्या नष्ट करताना पोलिस कर्मचारी.
भुसावळ - निंभोरा येथीलस्टेशन रोडवरील सेंट्रल बँकेच्या शाखेत बुधवारी रात्री चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून पोलिसांनी गावातील दीपक शरद भंगाळे याला अटक केली आहे. 
 
स्टेशन रोडवरील सेंट्रल बँकेच्या मागील बाजूने एसी रूमची खिडकी तोडून आत शिरलेला चोरटा, यानंतर त्याने तोडलेला दरवाजा आदी सर्व चित्रिकरण सीसीटीव्हीत झाले होते. हे फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत गावातीलच दीपक भंगाळे याला संशयीत म्हणून अटक केली. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक एम.एच.लवंगे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कदम, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, हवालदार राकेश वराडे, राजू कुमावत, ज्ञानेश्वर पाटिल, मोहंमद तडवी, मेहमुद शहा, ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, जितेंद्र जैन यांनी ही कारवाई केली.या चोरीप्रकरणी सेंट्रल बँकेचे नाशिक येथिल वरिष्ठ अधिकारी अशोक लाठे यांनी विशेष लक्ष दिले. तपासात इतरही माहिती उघड होईल. 
 
अवैधधंद्याविरुद्ध मोहीम उघडलेल्या पोलिसांनी मांडवादिगर आणि भानखेडा शिवारात तापी नदीच्या काठावरील गावठी दारुच्या चार भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ४५ हजार ३०० रुपये किमतीची दारू रसायन नष्ट करण्यात आले. परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया, भुसावळ तालुक्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब गायधनी यांनी ही कारवाई केली. 
 
सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पाेलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यानुषंगाने गुरुवारी सकाळी भानखेडा मांडवादिगर शिवारात तापी नदीकाठावरील गावठी दारुनिर्मितीच्या भट्ट्या नष्ट करण्यात आल्या. मात्र, पोलिस आल्याचे पाहून आरोपींनी पलायन केले. पोलिस पथकाने दारुच्या भट्ट्यांसोबतच नवसागर, माेह, गुळ अादी कच्चे रसायन जागेवरच नष्ट केले. मांडवा दिगर भानखेडा येथे वेगवेगळे छापे टाकून ही कारवाई झाली. 
 
मांडवा दिगरमध्ये एकूण चार हजार, तर भानखेडा येथे नदीकाठी दाेन भट्ट्या नष्ट करण्यात आल्या. तेथे हजार ४०० रूपये किमतीची ७० लिटर गावठी दारू, उकळते कच्चे रसायन ९० लिटर तयार दारू मिळाली. २०० लिटर मापाचे सात पत्री ड्रममधील कच्चे रसायनदेखील नष्ट करण्यात आले. दोन्ही मिळून एकूण ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट झाला. या कारवाईत सातत्य ठेवू, असे पोलिस निरीक्षक गायधनी यांनी सांगितले. 
 
माहिती द्या 
- भुसावळ तालुकापोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे, गावठी दारूची विक्री चालू देणार नाही. कारवाईत सातत्य राखण्याच्या सूचना सहकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कुठेही अवैध धंदे सुरू असतील, तर नागरिकांनी माहिती द्यावी. नावे गुप्त ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मनीषकलवानीया, सहायक पोलिस निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...