आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: 29 दिवसांपूर्वी झाले लग्न, सासरच्या लोकांनी फोनकरुन सांगितले तिने घेतली फाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा सामान्य रुग्णालयात जमलेले आशाबाई कोळी यांचे नातेवाईक. - Divya Marathi
जिल्हा सामान्य रुग्णालयात जमलेले आशाबाई कोळी यांचे नातेवाईक.
जळगाव - गेल्या महिन्यात १८ मार्च रोजी लग्न झालेल्या नवविवाहितेचा लग्नाच्या २९व्या दिवशीच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी हिंगोणे (ता. धरणगाव) येथे घडली. सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी तिचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. 
 
जळगाव तालुक्यातील भाेलाणे येथील शेतकरी गोकुळ धर्मा कोळी यांची सर्वात लहान मुलगी आशाबाई सुनील कोळी (वय २२) यांचा विवाह हिंगोणे (ता. धरणगाव) येथील सुनील कोळी याच्याशी १८ मार्च रोजी झाला. सुनील कोळी हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात. नवविवाहिता १३ एप्रिलला पहिले मूळ लावून सासरी गेली होती. त्यानंतर तीनच दिवसांत तिच्यावर असा प्रसंग ओढवला. रविवारी दुपारी १२ वाजता पती सुनील, सासू सासऱ्यांनी आशाबाईला मृतावस्थेतच धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फोन सासरच्या मंडळींनी नातेवाइकांना केले. माहेरच्या लोकांना आशाबाईच्या आत्महत्येची बातमी मिळताच त्यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालय गाठले. तोपर्यंत तिच्या सासरच्या मंडळींनी तेथून पोबारा केला होता. आशाबाईने गळफास घेतल्याच्या कुठल्याही खुणा तिच्या गळ्यावर आढळून आल्या नाहीत, त्यामुळे सासरच्या लोकांनी आशाबाईचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. तसेच माहेरच्या लोकांनी पोलिसांच्या मदतीने तिचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करण्यापूर्वी तिच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी रुग्णालयातच केली होती. सासरच्या लोकांना अटक झाल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पाेलिसांनी त्यांची समजूत काढली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळेल त्यानंतर लागलीच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानंतर दुपारी 4 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह माहेरच्यांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी 7 वाजता भोलाणे येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात आशाबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
नाकातली नथ वाकल्यामुळे अधिक संशय बळावला 
आशाबाईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्या लोकांनी पोलिस, तसेच नातेवाइकांना सांगितले होते. मात्र, तिच्या गळ्यावर दोरीची कोणतेच व्रण उमटलेले नव्हते. माहेरच्या लोकांनी मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या नाकातली नथ वाकलेली दिसून आली. त्यामुळे तिला मारहाण करून तसेच उशीने तिचे नाक दाबून खून केल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला होता. वाकलेल्या नथमुळे त्यांचा संशय अधिक बळावला होता. त्यामुळे माहेरच्यांनी या घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. 
 
पंचनामा न झाल्यामुळे संताप
आशाबाईने गळफास घेतल्याचे सासरच्यांकडून सांगितले जात होते; पण ज्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आला त्या जागेचा परिस्थितीचा पंचनामा झालेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात अाहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतर खरे कारण समाेर येईल. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सासरच्यांनीच तिचा खून केला... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...