Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Women Make Up Tips

महिलांनी उन्हाळ्यात भडक मेकअप करणे टाळावे

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 09:32 AM IST

  • महिलांनी उन्हाळ्यात भडक मेकअप करणे टाळावे
जळगाव - उन्हाळ्यात ऊन, धूळ घामामुळे त्वचा तेलकट होत असते. पण लग्न समारंभात मेकअप शिवाय पर्याय नसताे. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअप बदलणेसुद्धा गरजेचे आहे. चेहऱ्याला ‘नॅचरल लूक’ देण्याचा प्रयत्न या दिवसात करावा. त्वचा डागरहित असेल तर फाउंडेशनचा प्रयोग करू नये. मात्र, भडक मेकअप या दिवसात केला जात नाही. चेहऱ्याचे डाग लपवायचे असतील तर फाउंडेशन किंवा पावडर लावायच्या आधी कंसीलर लावायला पाहिजे. कंसीलर एका छोट्याशा ब्रशने लावून वर थोडी पावडर लावावी. नॅचरल लूकसाठी लिपस्टिकच्या जागी लिप-ग्लाॅसही चालते. रात्री चेहरा आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक लिप ब्रशच्या मदतीने लावावी. उन्हाळ्यात दिवसा लाइट ब्राऊन, रोज, पिंक आणि रात्री ब्रांज, कोरल, कॉपर आणि बुरुगंडी रंगांच्या लिपस्टिकचा वापर करायला हवा. त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात वाढ होईल.
ही घ्यावी काळजी
- उन्हाळ्यात आपल्या त्वचेला सतत उष्णता जाणवत राहते आणि त्वचा चिकटही बनते. आपल्याला सतत चेहरा पुसावासा किंवा थंड पाण्यानं धुवावासा वाटतो. त्यामुळे चेहऱ्यावरचा मेकअप निघून जातो. तुम्हालाही अशी सवय असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात गडद मेकअप करणं टाळा. कारण चेहरा सतत पुसत राहिलात की मेकअप तर पूर्णपणे जात नाही पण त्या मेकअपचे पॅच चेहऱ्यावर राहतात. दिसायलाही चांगले दिसत नाही.
- मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला स्किन टाेनर लावावे. उन्हाळ्यामध्ये फाउंडेशन लावल्याने थोडं जड वाटू शकते. अशावेळी टिण्टेड मॉइश्चरायझर लावावे. हे दोन प्रकारे काम करते. यामुळे त्वचेला आद्रता मिळते आणि चेहऱ्यावर समान टोन येतो.

- लिपस्टिक/लिप बाम किंवा आय शॅडो लावताना त्वचेला शोभून दिसतील अशा लाइट पेस्टल शेड्स निवडा. सध्या पेस्टल शेडचा ट्रेंड आहे. थोडी चमक असलेले सॉफ्ट रंग तुम्हाला उत्तम समर लूक मिळवून देतील आणि त्याचबरोबर तुमचा चेहराही उजळवतील. याचा आणखी एक फायदा म्हणजे मेकअप उतरू लागला तर पटकन लक्षात येणार नाही.
उन्हाळ्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टसचा वापर करा
- मेकअप पूर्ण करण्यासाठी अखेरीस चेहऱ्याला ट्रान्सल्युसण्ट पावडर लावायला विसरू नका. ही पावडर चेहऱ्यावरची जास्त चमक कमी करते आणि चेहऱ्याला एक मॅट लूक देते.
- डोळ्यांसाठी दिवसा फक्त काजळ लावावे. गरज भासल्यास आय शॅडोसुद्धा लावू शकता. ब्राऊन आणि ग्रे आय शॅडो नॅचरल लूक देतात. रात्रीच्या वेळी आय लायनर लावू शकता. रात्रीच्या मेकअपमध्ये आयब्रोजच्या खाली थोडंसं हाय-लाइटर लावावे. यासाठी तुम्ही पांढरा किंवा कोणत्याही लाइट रंगाची शेड वापरू शकता. मस्कारा जरूर लावावा.
- तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असेल आणि गडद मेकअप करणे आवश्यक असेल तर ब्लॉटिंग पेपरचा वापर वाइप म्हणून चांगल्या प्रकारे करता येईल. हा कागद चेहऱ्यावर हलकेच दाबून ठेवा आणि अतिरिक्त चमक काढून टाका.

- गालांवर हलक्या ब्लशरचा वापर करावा. पावडर ब्लशरचा वापर करणे सर्वांत सरळ असते. जे नेहमी मेकअप करण्याअगोदर लावायला पाहिजे.
हलका मेकअप करा
-तेलकट असेल तर वेगळा टाेन असताे. स्किन टाेनर लावावा त्यानंतर वाॅटरप्रुफ मेकअप लावावा लुज पावडरचा वापर करावा. तर लाऊड मेकअप करतच नाही कारण ताे निघून जाताे. त्यामुळे हलका मेकअपच या दिवसात करावा. तनुजा महाजन, ब्युटीशियन

Next Article

Recommended