आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात उष्माघात; महिला हाॅकर्सचा मृत्यू, आठवडाभरात तिसरा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराकडील काम सुटल्याने तीन महिन्यांपासून कांदे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला हाॅकर्सचा रविवारी सकाळी ११ वाजता सुभाष चाैकात उष्माघातामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताचा हा तिसरा बळी ठरला अाहे. 
 
सुभाष चाैकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भवानीपेठ, इस्लामपुरा येथील रहिवासी रेहनाबी मन्सूर खान (वय ३५) ह्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेकेदाराच्या हाताखाली कामाला हाेत्या; परंतु गेल्या तीन महिन्यांपासून काहीही काम नसल्याने त्यांनी राेजगारासाठी घरासमाेर सुभाष चाैकातील रस्त्यावर कांदे विक्रीसाठी हातगाडी लावली हाेती. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू होता; मात्र गेल्या तीन दिवसांपासून दिवसा उन्हात काम करणाऱ्या रेहनाबी यांना रविवारीसकाळी ११ वाजता भाेवळ अाली. जवळच घर असल्याने नातलगांनी धाव घेतली असता त्यांच्या ताेंडातून फेस निघाला. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. मृत रेहनाबी यांना १२ वर्षांचा मुलगा असून ताे सांगलीजवळ मदरशामध्ये अाहे. एकुलत्या मुलाचे मातृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत अाहे. 
 
चोपड्यात दोघांचा बळी 
चहार्डी- चाेपडा तालुक्यातील चहार्डीच्या वंदना वनराज महाजन (वय ४६) शनिवारी शेतात दादरची कापणी करता असताना भोवळ येऊन पडली. उष्माघाताने मृत्यू झाला. तसेच चोपडा शहरातील फुलेनगरात दीपक रवींद्र शेटे (वय ८) या बालकाचा एप्रिल राेजी उष्माघाताने मृत्यू झाला होता. अाईला घराच्या टेरेसवर पापड टाकण्यासाठी ताे मदत करत हाेता. सायंकाळी ४.३० वाजता भाेवळ येऊन पायऱ्यांवर ताे पडला हाेता; परंतु उपचारासाठी नेण्यापूर्वीच उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला हाेता. 
 
पुढचे तिन दिवस तापमानाचे
पुणे -
उष्णतेचीही लाट अजून तीन ते चार दिवस टिकून राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुजरात, राजस्थानमधून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव केवळ वाढल्याने पुढचे तीन ते चार दिवस वाढत्या तापमानाचे असतील, असे आयएमडीने म्हटले आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश इतके नोंदवले गेले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...