आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसाने 24 तासांत शोधले विवाहितेला, कौटुंबिक वादामुळे गेली होती मैत्रीणीकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कौटुंबिक कलहाच्या वादातून २३ जानेवारी रोजी घरातून निघून गेलेल्या विवाहितेला २४ तासांत रायगड जिल्ह्यातून शोधून आणत घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी महिला पाेलिस कर्मचारी अभिलाषा मनोरे यांना विशेष जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी तपासातून रायगड जिल्ह्यातील नवघर येथे राहत असलेल्या वर्ग मैत्रिणीकडे सदर विवाहितेला शोधून काढले. 
 
कासमवाडीतील भरत पाटील हे खासगी कंपनीत नाेकरी करतात. २३ जानेवारीला कौटुंबिक कलाहातून त्यांची पत्नी साेनाली पाटील (वय २६) या रागात घरातून निघून गेल्या होत्या.
 
माहेरच्या मंडळींसह पतीने शोध घेऊनही विवाहिता सापडत नसल्याने त्यांनी २९ जानेवारी रोजी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. निरीक्षक सुनील कुराडे यांनी बेपत्ता महिलेचा तपासाची जबाबदारी महिला पाेलिस कर्मचारी अभिलाषा मनोरे यांना दिली. त्यांनी माहेरच्या सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक माहितीसह शालेय जीवनातील माहिती घेतली. 
 
त्यावरून विवाहितेच्या जवळच्या मैत्रिणींना फोनकरून सदर महिलेचा तपास लावला. यात बेपत्ता महिला रायगड जिल्ह्यातील जाभूळपाल तालुक्यातील नवघर येथे राहत असलेल्या मैत्रिणीकडे आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी रायगड येथे जाऊन साेनाली पाटील यांना शाेधून काढले. हरवलेल्या महिलेला जळगावात सुखरूप परत आणून कायदेशीर पूर्तता केल्यावर पती आईच्या ताब्यात देण्यात आले. वादावर पती-पत्नी, नातेवाईकांना तोडगा काढण्याची संधी देण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...