आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्यसनाधीनता निर्मूलन’, ‘बेटी बचाअाे- बेटी पढाओ’चा महिलांनी दिला संदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला असोसिएशनतर्फे शनिवारी रॅली काढण्यात आली. यात व्यसनाधिनता निर्मूलन, बेटी बचाअाे बेटी पढाअाे, स्त्री पुरुष समानता, च्या अात घरात मुलगा की मुलगी यासारख्या विषयांवर संदेश दिला. तसेच महिलांची स्लोगन आणि एकसारखी वेशभुषा स्पर्धा घेण्यात अाली. यात शहरातील विविध मंडळांच्या महिलांनी सहभाग नाेंदवला.
 
जी.एस.मैदानापासून रॅलीची सुरुवात करण्यात अाली. यात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची प्रमुख उपस्थिती हाेती. ही रॅली जीएस मैदानापासून हनुमान मंदिर, बँक स्ट्रीट, सरस्वती डेअरी मार्ग, नेहरु पुतळा, काेर्ट चाैकातून गंधे सभागृहात समारोप करण्यात अाला. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षा राजकमल पाटील, राजकुमारी बाल्दी, वासंती दिघे, हेमलता राेकडे, कमल पाटील, मंगला नगरकर, भारती पाथरकर अादिंनी सहभाग नाेंदवला.
 
अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या महिला ढाेल पथकाने रॅलीचे स्वागत केले. महिला ढाेल पथकाच्या तालावर ही मिरवणूक काढण्यात अाली. या वेळी महिला मंडळांनी अनेक रंगाच्या साड्या परिधान केल्या हाेत्या. यामध्ये अापल्या मंडळाचे प्रतिनिधीत्व करीत त्यांनी सहभाग नाेंदवला. यामध्ये जवळपास ५० ते ६० महिलांचा सहभाग हाेता. त्यानंतर गंधे सभागृहात तृप्ती देसाईंची मुलाखत पार पडली. 
 
जागतिक महिला दिनानिमित्ताने शुक्रवारी महिला मंडळांतर्फे शहरातील विविध मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन सहभागी झालेल्या महिला मंडळाच्या पदाधिकारी सदस्या. 
 
नशे की मार सबसे बडी मार, बरबाद करे सुखी परिवार, तंबाखु की नशा जीवन की दुर्दशा, जन जन का यही संदेश नशा मुक्त हाे अपना देश, क्याे शराब पिते हाे अपने देश काे बरबाद करते हाे, अब ना बनाअाे काेई किस्सा बेटीअाे काे दाे समान हिस्सा, लडका पढे ताे अकेला बढेगा, लडकी पढी ताे दाे परीवार अागे बढेंगे, बेटी हाेती है देश की शान इससे मिलती है सबकाे पहेचान यासारखे संदेश फलकांद्वारे देण्यात आले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...