आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे- दुसरीशी घराेबा; तिलाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, अंगठी, पैशांसाठी छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पहिली पत्नी असताना दुसरीशी घराेबा केल्यानंतरही दुसरीचा साेन्याची अंगठी व्यवसायासाठी एक लाख रुपये अाणावेत, या कारणावरून सासरच्या लाेकांनी छळ केला. तसेच माहेरी घेण्यासाठी अाले असताना तिच्यासह तिच्या अाईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 
याबाबत दीपाली संजय साेनकांबळे (२६, रा.नटराज टाॅकीजजवळ) यांनी पाेलिसांत तक्रार दिली अाहे. त्यात पती संजय अनिल साेनकांबळे (३१), सासरे अनिल गाेरख साेनकांबळे (५६), सासू राधाबाई अनिल साेनकांबळे (५१), दीर अरुण अनिल साेनकांबळे (३६), पल्लवी अरुण साेनकांबळे (३२), मनीषा अनिल साेनकांबळे (१९), बाळू गाेरख साेनकांबळे (५९), अलका बाळू साेनकांबळे (५७), जनाबाई ईश्वर देवरे (६१) आदींनी २३ फेब्रुवारी २०१२पासून वेळाेवेळी काेपरगाव माहेरी पतीसाठी कबूल केलेली अंगठी अाणली नाही अाणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून एक लाख रुपये अाणावेत यासाठी शारीरिक मानसिक छळ केला. 
 
तसेच अापल्याला घेण्यासाठी अाले असताना अापल्यासह अापल्या अाईला साडीने गळफास देऊन पती संजयने ताेंडावर उशी ठेवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. संजयची पहिली पत्नी हयात असताना त्याने दुसरे लग्न केले, असे म्हटले अाहे. याप्रकरणी न्यायालयाच्या अादेशानुसार अाझादनगर पाेलिस स्टेशनमध्ये या सर्वांविरुद्ध भादंवि कलम ३०७, ४५८ (अ), ४२०, ४०६, ४९४, ३२३, ५०४, ५०६, ३४नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास उपनिरीक्षक जी.यू.नागलाेट करीत अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...