आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या महिला आमदार व नीलम गोऱ्हेंना अश्लाघ्य मॅसेज करणाऱ्या RTI कार्यकर्त्याला जळगावमधून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/ नाशिक/ मुंबई -  नाशिकच्या महिला आमदाराला मध्यरात्रीनंतर फोन करून मोबाइलवर शिवीगाळ अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्या अटकेसाठी नाशिकचे पथक बुधवारी पहाटे ४.३० वाजता जळगावला अाले. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला मंगळवारीच अटक केल्याने पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. 
 
माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी मोबाइलवरून विलेपार्ले परिसरातील महिला आमदाराला २१ फेब्रुवारीला अश्लील मेसेज पाठवल्याची तक्रार पाेलिसांत करण्यात अाली हाेती. याप्रकरणी मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास पाटील, संतोष शिंदे, उमेश अडकमोल यांच्या पथकाने मंगळवारी गुप्ता यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी पहाटे ४.३० वाजता नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक साईप्रकाश चन्ना, माळोदे यांच्यासह चाैघांचे पथक गुप्तांना अटक करण्यासाठी जळगावात आले होते. 
 
हे आहे प्रकरण 
नाशिक येथील महिला आमदारांच्या मोबाइलवर साेमवारी मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिटांनी ८६२४०२७४१४ या क्रमांकावरून मिस कॉल आला होता. मात्र, मोबाइलचे रिंगर बंद असल्याने माेबाइल उचलण्यात आला नाही. त्यानंतर पुन्हा तीन मिनिटांनी म्हणजे १२ वाजून १० मिनिटांनी त्यांना अश्लील भाषेत मेसेज अाला.
 
पुन्हा मिनिटाला म्हणजे १२ वाजून १९ मिनिटांनी अाणखी एक मेसेज प्राप्त झाला. त्यात पोलिसांना कळवले, तर गोळ्या घालून ठार मारू, असा धमकीचा मेसेज होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मेसेज आलेल्या मोबाइलचे टाॅवर लोकेशन घेतले. त्यानंतर नाशिक पाेलिसांचे पथक जळगावात अाले. त्यांनी शहर पाेलिसांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 
 
तो नंबर माझा नाही.. 
पोलिसांनी याबाबत गुप्ताला जळगावच्या पोलिस ठाण्यात नेऊन विचारणा केली असता तो आपला क्रमांक नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिस गुप्ताला घेऊन मुंबईत आले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, नेमके काय होते प्रकरण.. कधी काय घडले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...