आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या, रहिवाशांमध्ये भीती वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- शहरातील विस्तारित भागातील तीन घरांमध्ये धाडसी चोरी उघडीस आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी गाढ झोपेतील तीन कुटुंबीयांच्या घरांमधून ६५ हजारांच्या रोकडसह १५ हजारांचे मोबाइल लांबवले. यामुळे रात्रीच्या पोलिस गस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
 
शहरातील फैजपूर रस्त्याला लागून असलेल्या विरारनगरात यासिनखान गफूर खान हे फळांचे व्यापारी आपले तिन्ही भावंड आणि त्यांच्या पत्नी असे एकुण सात जणांच्या कुटुंबासह राहतात. संपूर्ण खान कुटुंबीय बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. त्यांच्या झोपेचे गैरफायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर घराच्या दरवाजाजवळील खिडकीतून लोखंडी सळईच्या सहाय्याने आतील भागातून लावलेली कडी उघडली. यानंतर त्यांनी घरात प्रवेश करत खान यांच्या खुंटीला टांगलेली पॅन्ट लांबवली. या पॅन्टच्या खिशात त्यांचा हजार ६०० रूपयांचा मोबाइल फळांच्या खरेदीसाठी ठेवलेले ५४ हजार रुपये होते. यानंतर चोरट्यांनी खान यांचे शेजारील घरातून साडेपाच हजाराची रोकड सात हजारांचा मोबाइल लांबवला. याच विस्तारित भागातील लोकेशनगरातील अय्युब रज्जाक तडवी हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपले होते. चोरट्यांनी मागील बाजूने त्यांच्या घरात प्रवेश करत मोबाइल पाच हजारांची रोकड लांबवली. गुरुवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. 
 
फळांच्या व्यापाऱ्याचे ५४ हजार रुपये लांबवले 
पोलिस गस्ती हवी : चोरट्यांनी एकाच भागातील तीन घरांमधून धाडसी चोरी केल्याने रहिवासी कमालीचे भयभीत झाले आहेत. या चोरट्याचा बंदोबस्त करण्यासाठी यावल पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका सईदाबी शेख हारून यांनी केली आहे. नागरिकांची हीच भावना आहे. 
 
असे होते पैसे : यासिन खान गफुर खान हे फळांचे व्यापारी आहेत. ते किरकोळ विक्रेत्यांना फळे पुरवतात. बुधवारी त्यांनी गावातील गोपाळ बारी यांच्याकडून २८ हजार महेमूद खान यांच्याकडून २६ हजार रूपये आणले होते. पहाटे भुसावळच्या बाजारातून फळे आणण्यास जायचे असल्याने त्यांनी ही रक्कम पॅन्टच्या खिशात ठेवली होती. ही पॅन्ट चोरी झाली. 
फळांचे व्यापारी यासिन खान यांच्या याच घरातून चोरी झाली. 
बातम्या आणखी आहेत...