आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमधील पाणीप्रश्न सुटणार; 5 महिन्यांचा साठा करता येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- तलावाच्या कामासाठी नगरसेवक अतुल पाटील पाठपुरावा करत आहेत. नवीन तलावाच्या निर्मितीमुळे पालिकेचा जलसाठा २० कोटी लीटरवर पोहोचेल. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. पालिकेच्या साठवण तलावाची गळती रोखण्याचे काम करण्याचे नियोजन आहे. तसेच तलावालगत असलेल्या पालिकेच्या जागेवर तलाव उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात या तलावाला गळती लागू नये म्हणून संपूर्ण तलावास प्लास्टिक कोटींग केले जाणार आहे. यासंदर्भात सिव्हील इंजिनिअर आर.एस. महाजन यांनी २२ फेब्रुवारीच्या पालिकेतील सभेत आराखडा सादर केला होता. २० कोटी लिटर जलसाठा करण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत चर्चा करण्यात आली होती. या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या विषयाला नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी संमती दिली होती. तसेच नगरसेवक अतुल पाटील यांनी आमदार जावळे यांची भेट घेऊन अतिरिक्त तलावासाठी निधीसंर्दभात चर्चा केली. त्यामुळे आमदार जावळे यांनी मुंबईत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन निधीसंदर्भात पत्र दिले. त्यामुळे पाठपुरव्याला आता गती मिळाली आहे. 
 
गळतीमुळे होते नासाडी 
एकूण जलसाठ्यापैकी तब्बल ४० टक्के पाणी गळतीमुले वाया जाते, अशी बाबवॉटर ऑडीटमधून समोर आली. त्यामुळे गळती रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साठवण तलाव उभारणे आवश्यक होते. मात्र, आता ही समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल, असे नगरसेवक अतुल पाटील यांनी सांगितले. 
 
सद्य:स्थिती अशी 
२००० मध्ये ९० दिवस पुरेल इतका पाणीसाठा करण्यासाठी पालिकेने भालशिव रस्त्यावर तलावाची निर्मिती केली होती. जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून हतनूर कालव्यालगत साडेसहा कोटीचा निधी खर्च करून या तलावाची निर्मिती झाली. मात्र, तलावात गाळ साचल्याने साठवणक्षमता निम्म्यावर आली आहे. सध्या बंधाऱ्यात कोटी ४२ लाख लीटर जलसाठा होतो. दिवसाआड पाणीपुरवठा करून हा साठा दीड महिना पुरतो. मात्र, अतिरिक्त बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे २० कोटी लिटर जलसाठा होईल. हा साठा दररोज पाणीपुरवठा केला तरी पाच महिने टिकेल. 
 
साठवण तलावाची गळती रोखण्यासह तलावाला लागूनच पुन्हा एक तलाव उभारणी करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार हरिभाऊ जावळे यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नवीन तलावामुळे २० कोटी लिटर जलसाठा करता येईल. त्यामुळे सध्या दीड महिना पुरणारा साठा नव्या तलावामुळे पाच महिने पुरेल. 
बातम्या आणखी आहेत...