आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणीचा निषेध, कर्मचाऱ्यांचे काम बंद, रुग्णालयास कुलूप, गुरुवारी काळ्या फिती लावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल पोलिस ठाण्यात एकत्र आलेले आरोग्य कर्मचारी. - Divya Marathi
यावल पोलिस ठाण्यात एकत्र आलेले आरोग्य कर्मचारी.
यावल- येथील ग्रामीण रूग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना मंगळवारी मारहाण झाली होती. या प्रकरणी आरोग्य सेवेतील संघटना आक्रमक झाल्या असून बुधवारी संघटनेचे पदाधिकारी निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संशयीतांच्या अटकेबाबत पोलिसांना जाब विचारला. तसेच वैद्यकीय अधिकारी मिळेपर्यंत ग्रामीण रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेकडो रूग्णांचे हाल झाले. 

येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नाही. परिणामी या रुग्णालयातील कर्मचारी मंगळवारच्या अपघातामध्ये जखमी झालेल्यांचे नातेवाईक आणि हितचिंतकांच्या उद्रेकाचा बळी ठरले. मंगळवारी दुपारच्या या घटनेत दोन महिला दोन पुरूष अशा चार कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी वसंतकुमार सदांनशिव यांच्या फिर्यादीवरून सिराज पिंजारी किनगाव बुद्रूकचे उपसरपंच राजू पिंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
 
दरम्यान, या मारहाणीचा सार्वजनिक आरोग्य अधिपरिचारिका संघटनेने निषेध केला. बुधवारी संशयीतांच्या अटकेसाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा लष्करे, सचिव निशा चौधरी, सहसचिव रजनी बडगुजर, जयश्री वानखेडे, विकास धनगर, शंकर रेड्डी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड आदींनी पोलिसांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली. 
 
तसेच जोपर्यंत यावल ग्रामीण रूग्णालयात कायम वैद्यकीय अधिकारी देत नाही, तोपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई होईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिले आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर तपास करीत आहे. 

- यावलमधील प्रकाराबाबतआरोग्य संचालकांशी चर्चा केली आहे. त्यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकारी देण्याचे आश्वासन दिले आहे. गुरुवारी कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करतील. व्ही.आर.जयकर,निवासी वैद्यकीय अधिकारी, जळगाव 
 
आरोग्य सेवा झाली खंडित 
बुधवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेत रुग्णालयास कुलूप लावले. यामुळे दिवसभरात शेकडो रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागले. 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी..... 
बातम्या आणखी आहेत...