आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल नगरपालिका राबवणार करवसुलीसाठी पोस्टरचा फंडा, नळ कनेक्शन कापण्यासह वॉरंट देण्याची मोहीम सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - मार्च अखेर करवसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी पालिका प्रशासनाने वसुली मोहीमेला गती दिली आहे. शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातून लाख ६७ हजारांचा कर वसुल करण्यात आला. तर आगामी काळात १० हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या २४० थकबाकीदारांची नावे शहरात ठिकठिकाणी फलक (पोस्टर) लावून प्रसिद्ध केले जाणार आहेत. तसेच थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यासोबत वारंट बजावण्याची कारवाई सुरू झाली आहे. 
 
पालिकेला मालमत्ता करापोटी वर्षिक ८९ लाख ७६ हजार तर पाणीपट्टीतून ८७ लाख ४४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. यंदा पालिकेला दोन कोटी ६४ लाख ७७ हजार रूपये वसुलीचे उद्दीष्ट मिळाले होते. त्यापैकी रविवारपर्यंत एक कोटी दोन लाख ९४ हजार रूपयांची करवसुली पालिकेने पूर्ण केली आहे. 
 
आता मार्चअखेर उरलेल्या १९ दिवसात एक कोटी ६१ लाख ८२ हजार रुपयांची करवसुली करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. त्यामुळे करवसुली कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवशीदेखील करवसुलीला गती दिली जात आहे. एकट्या जे.टी.महाजन सूतगिरणीकडे पालिकेचा ७६ लाखांचा कर थकित आहे. त्यामुळे उरलेल्या १९ दिवसात करवसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. 
 
- मालमत्ता करपाणीपट्टी वसुलीसाठी वसुली वाॅरंट बजावण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार थकबाकीदारांना कर भरण्यासाठी मुदत दिली जात आहे. या मुदतीत कर भरल्यास संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाणार आहे. -सोमनाथ आढाव,मुख्याधिकारी 
 
पालिकेला सहकार्य करावे 
पालिका प्रशासनाची थकबाकी भरून नागरिकांनी सहकार्य करावे. वेळीच कर भरल्यास नळ कनेक्शन कट करणे, वारंट बजावणे प्रसंगी मालमत्ता जप्त करण्यासारखी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कारवाईचा कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन यावल पालिकेतर्फे करण्यात आले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...