आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल : जमावाची दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; यावलमध्ये पुन्हा राडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल पोलिस ठाण्याबाहेर असा जमाव एकत्र आला होता. - Divya Marathi
यावल पोलिस ठाण्याबाहेर असा जमाव एकत्र आला होता.
यावल - सानेगुरूजी विद्यालयातील जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी शहरात पुन्हा वाद उफाळला. त्यात एका गटाने दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जणांसह अज्ञात आरोपींविरुद्ध दंगलीसह अन्य सहा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
पालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या फेब्रुवारीच्या स्नेहसंमेलनाद वाद झाले होते. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांसह २० जणांवर अँट्रॉसीटी, दंगलीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयीत कुंदन शशिकांत बडगुजर हा विद्यार्थी सकाळी ११.३०च्या सुमारास कामानिमित्त पालिकेच्या व्यापारी संकुलात गेला होता. तेथे जमावाने त्याला मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी कुंदन बुडगुजर घराकडे पळाला. यानंतर शेजारील महिला शोभाबाई कोल्हे यांनी कुंदनला घेवून पोलिस ठाणे गाठले. मात्र, याचा राग आल्याने हितेश गजरे, विलास भास्कर, युवराज समरथ सोनवणे, युवराज सुपडू भास्कर (सर्व रा.बोरावल गेट), चेतन दिलीप गजरे, आनंद बिऱ्हाडे, आकाश सुरवाडे, विशाल गजरे, स्वप्निल पारधे (सर्व रा.सिद्धार्थनगर) आणि इतर ते जणांनी शोभाबाई यांचा मुलगा विशालला घरात घुसून फाईटरने मारहाण करून जखमी केले. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी विशालला जमावाच्या ताब्यातून सोडवले. याप्रकरणी विशाल कोल्हे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहायक फौजदार विठ्ठल धनगर, संजय तायडे तपास करीत आहेत. 

सकाळी झाली मारहाण : कुंदनबडगुजर यास सकाळी ११.३० वाजता पालिकेच्या संकुलासमोर चेतन दिलीप गजरे, आनंद सुरवाडे आकाश पारधे (सर्व रा.सिद्धार्थनगर) यांनी मारहाण केली. याप्रकरणी शोभाबाई कोल्हे या कुंदनसोबत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, याचा राग आल्याने आरोपींनी शोभाबाईंचा मुलगा विशाल यालादेखील मारहाण केली. ही वार्ता शहरात पसरताच पोलिस ठाणे रुग्णालयात गर्दी झाली होती. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, दोघे विद्यार्थी गंभीर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...