आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमधील लढती आज स्पष्ट होणार, भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मंगळवारी यावलमध्ये एकूण आठ अर्ज दाखल झाले. बुधवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून तहसील कार्यालयात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. यानंतर दुपारी तीन वाजता सर्व गट गणातील संभाव्य लढतींचे चित्र स्पष्ट होईल. 
 
जिल्हा परिषदसाठी मंगळवारी साकळी-दहिगाव गटातून भाजपचे रवींद्र सूर्यभान पाटील यांनी प्रातांधिकारी मनोज घोडे-पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, उजैन्नसिंग राजपूत उपस्थित होते.
 
 हिंगोणा-सावखेडासीम गटातून काँग्रेसकडून कमल शामराव मेघे यांनी भालोद-पाडळसा गटातून भाजपच्या नंदा दिलीप सपकाळे, तर काँग्रेसच्या सुकदेव पुंजोजी बोदडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंचायत समितीच्या साकळी गणातून भाजपचे दीपक नामदेव पाटील, भालोद गणातून लताबाई भगवान कोली, पाडळसा गणातून काँग्रेसकडून रेखाबाई बाबुराव सपकाळे रूपाली शेखर तायडे या दोघींचे अर्ज दाखल झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...