आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोदवड- तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोदवड तालुक्यातील चिंचखेडा प्रगणे येथील तरुण भूषण विश्वनाथ टेकाडे (वय ३०) याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 
भूषण टेकाडे स्वत:च्या शेतातील विहिरीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी घेवून गेला होता. या वेळी तो पाय घसरून विहिरीत पडला. या वेळी मोठ्याने आवाज झाल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. या वेळी त्यांना भूषण पाण्यात पडलेला दिसला. या विषयी भूषणचा चुलत भाऊ यशवंत टेकाडे याला माहिती देण्यात आली. त्याने पोलिस पाटील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर भूषणला विहिरीबाहेर काढण्यात आले. मात्र, त्याचे प्राण वाचू शकले नाही. बोदवड ग्रामीण रुग्णालयात डॉ.अमोल पवार यांनी शवविच्छेदन केले. सायंकाळी भूषणवर अत्यंसंस्कार करण्यात आले. एकुलता एक मुलगा असलेल्या भूषणच्या पश्चात आई-वडिल, चार बहिणी असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...