आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : लग्नाच्या 2 दिवसआधीच मेहरूण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तांबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चाैकातील तरुणाचे २५ मे राेजी लग्न हाेते. मात्र, रविवारी सायंकाळपासून घरातून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी वाजता मेहरूण तलावात तरंगताना अाढळून अाला. तरुणाचा घातपात केल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांनी व्यक्त केला. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. 
 
बिस्मिल्ला चाैकातील सलमान बाबू पटेल (वय २५) हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत हाेता. त्याचा १२ मे राेजी पाचाेरा शहरातील बाहेपुरा भागातील मुलीसाेबत साखरपुडा झाला हाेता. मंगळवारी रज्जगाचा, बुधवारी हळद अाणि गुरुवारी लग्न हाेणार हाेते. रविवारी सलमान याने लग्नासाठी कपडे घेण्यासाठी १० हजार रुपये मागितले. मात्र, घरच्यांनी त्याला हजार रुपये दिल्याने ताे रागावला हाेता. रविवारी सायंकाळी वाजता ताे घरातून कपडे घेऊन येताे, असे सांगून निघाला. त्यानंतर रविवारी रात्रभर साेमवारी सकाळपर्यंत सलमान घरी अाला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शाेधाशाेध केली. शेवटी त्याचे वडील बाबू पटेल यांनी साेमवारी सकाळी ११ वाजता एमअायडीसी पाेलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतरही नातेवाइकांनी शाेध सुरूच ठेवला. मंगळवारी सकाळी वाजता मेहरूण तलावाजवळ एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे कर्मचारी अशाेक पवार हे गस्त घालत हाेते. त्या वेळी त्यांना तलावाच्या 
वादामागचे नेमके कारण काय? 
 
मध्यभागी एक मृतदेह तरंगताना अाढळला. त्यांनी हेमंत कळसकर अाणि बशीर तडवी यांना फाेनवरून माहिती दिली. त्यानंतर तडवी यांनी घटनास्थळावर अाल्यानंतर शेख जमील शेख उस्मान यांना फाेनवरून मृतदेहासंदर्भात माहिती दिली. शेख जमील यांनी त्याच्या भावाला तसेच सलमानची बहिण यास्मिन भाऊ अरमान यांना घेऊन मेहरूण तलावावर अाले. पाेलिसांनी रवी हटकर, किशाेर साेनवणे, अक्रम, अब्दुल रशीद या पट्टीच्या पाेहणाऱ्यांना बाेलावून मृतदेह काठापर्यंत अाणला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत हाेता. त्यामुळे त्याच्या गळ्यातील माळा, अंगठ्या अाणि दंडाला बांधलेला ताईतमुळे त्याची अाेळख पटली. लग्नाच्या दाेन दिवस अगाेदर भाऊ गेल्याने सलमानची बहीण अाणि भावाने अाक्राेश केला. 
 
सलमानला पाेहता येत हाेते 
मेहरूणतलावात बुडून मृत झालेला सलमान पटेल हा पट्टीचा पाेहणारा हाेता. त्याला चांगल्या पद्धतीने पाेहता येत हाेते. त्याचा बुडून मृत्यू हाेऊच शकत नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. त्याचा काेणी तरी घातपात केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणात दाेषी असणाऱ्यांना अटक हाेत नाही ताेपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा सलमानच्या नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतला. या वेळी एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी नातेवाइकांना त्याचा मृतदेह दाखवला. त्यावर काेणतेही मारहाण केल्याच्या खुणा नव्हत्या. तसेच शवविच्छेदन अहवाल अाल्यानंतर याेग्य ती कारवाई केली जाईल, असे अाश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी वाजता नेरीनाका परिसरातील कब्रस्थानमध्ये सलमानचा दफनविधी करण्यात अाला. 
 
माेबाइल,पैसे, कपडे गायब 
सलमानरविवारी सायंकाळी वाजता घरातून गेला तेव्हा त्याच्या जवळ हजार रुपये, माेबाइल हाेता. मात्र, मंगळवारी मृतदेह सापडला तेव्हा त्याचा माेबाइल, पैसे कपडे गायब हाेते. 
 
‘ते’ तीन तरुण कोण? 
सलमान याच्या घरी गेल्या ते दिवसांपासून त्याला नेण्यासाठी तीन तरुण येत असल्याचे गल्लीतील महिलांनी सांगितले. डाेळ्यांवर चष्मा तोंडाला रुमाल बांधून हे तरुण दुचाकी घेऊन त्याला घेण्यासाठी येत होते. एकदा त्याच्या आजीने त्यांना हटकले होते; पण त्यांनी आम्ही मित्र असल्याचे सांगितले. घटना घडली त्या दिवशी हेच तरुण गल्लीत आले होते. पोहताना भावी पत्नीचा फोन आल्यावर तिच्याशी तिघांपैकी एकाने बोलणे केल्याचेही समोर येत आहे. 
 
चेहरा ताे दिखा दो... 
सलमानचा मृतदेह पूर्णत: कुजला असल्याने अत्यंत उग्र दर्प येत होता. शवविच्छेदन गृहाबाहेरपर्यंत वास येत असल्याने तांबापुरात मृतदेह नेणे अशक्य होते.त्यामुळे शवविच्छेदनगृहातूनच अंत्ययात्रा काढून दफनविधीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तांबापुरातील रहिवासी, नातेवाइकांना रुग्णालयातच यावे लागले. पाचोरा येथून आलेली भावी पत्नी, बहीण यास्मिन, आई हाजरा यांनी अाक्राेश केला. अंत्ययात्रेपूर्वी त्याच्या आईने चेहरा दाखवण्यासाठी केलेल्या विनंतीने अनेकांना रडू कोसळले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...