आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनामीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, संशयितास कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप करून चारित्र्यावर संशय घेऊन दोघांनी हिराशिवा कॉलनीतील तरुणाला बेदम मारहाण केली. बदनामीच्या भीतीने त्या तरुणाने २३ फेब्रुवारीस आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची पाेलिस काेठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. चाैधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात अाले. या वेळी त्याला न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अाली. 
 
हिराशिवा काॅलनीत केदार सुभाष पाटील (वय २६) याचे परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून गजानन निकम, गौरव सोनवणे या दोघांनी केदारला २२ फेब्रुवारी राेजी मारहाण केली हाेती. या प्रकारामुळे घाबरलेल्या केदारने अात्महत्या केली हाेती.
 
याप्रकरणी गजानन निकम अाणि गाैरव साेनवणे यांच्याविराेधात अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी गजानन याला पाेलिसांनी २६ फेब्रुवारी राेजी अटक केली. त्याच्या पाेलिस काेठडीची मुदत गुरुवारी संपली. त्याला न्यायाधीश चाैधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. निखिल कुलकर्णी यांनी काम पाहिले. या प्रकरणातील दुसरा संशयित गाैरव साेनवणे हा अजूनही फरार अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...