आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, 15 दिवसांच्या अंतराने दुसरी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दादावाडी परिसरातील गुरुदत्त कॉलनीतील अभियंता तरुणीने घरात गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना साेमवारी दुपारी १२ वाजता घडली. या तरुणीसह तीच्या भावाचे लग्न करण्याविषयी घरात चर्चा सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. मात्र, तीच्या अात्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. स्नेहल जावरे असे या तरूणीचे नाव आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत अभियंता तरुणीची गळफास घेऊन अात्महत्या करण्याची ही शहरातील दुसरी घटना आहे. 
 
गुरुदत्त कॉलनीतील स्नेहल महेंद्र जावरे (वय २३) एमई (माहिती तंत्रज्ञान) झाली होती. मूळचे मुक्ताईनगर येथील असलेले स्नेहलचे वडील महेंद्र जावरे पाटबंधारे उर्वरित.पान १२ 
विभागाचेनिवृत्त अभियंता अाहेत, ते साेमवारी बाहेरगावी गेले हाेते. तर अाई सुरेखा जावरे अाणि भाऊ श्यामलाल हे महाबळमध्ये ब्राह्मणाकडे स्नेहल अाणि भाऊ श्यामलाल यांच्या लग्नासाठी पत्रिका दाखवण्यासाठी गेले हाेते. सकाळी ११.५० वाजता शेजारची महिला पापड देण्यासाठी घरात अाली. त्या वेळी स्नेहलने त्यांना बसण्यासाठी सांगितले. मात्र, अाई अाल्यावर येते असे सांगून त्या निघून गेल्या. दुपारी १२.३० वाजता तिची अाई अाणि भाऊ परत अाल्यानंतर त्यांनी दरवाजा ठाेठावला. मात्र, स्नेहलने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी मागच्या दरवाजातून जाऊन पाहिले, त्या वेळी स्नेहलने पंख्याला अाेढणीने गळफास घेतलेला दिसला. त्यामुळे तिची अाई सुरेखा या भाेवळ येऊन खाली पडल्या. भाऊ श्यामलाल याने अारडा-अाेरड केल्यानंतर शेजारी अाले. त्यांनी स्नेहलला खाली उतरवून तत्काळ खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तेथे अापत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन अहिरे यांनी तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात अाकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.
 
अाज अंत्यसंस्कार... 
मृत स्नेहलची माेठी बहीण शीतल ही विवाहित असून सांगली येथे राहते, ती डाॅक्टर अाहे. ती साेमवारी रात्री उशिरा पाेहाेचणार अाहे. त्यामुळे स्नेहलवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत.
 
१५  डिसेंबरलाही घडली अशी दुर्दैवी घटना... 
महाबळ परिसरातील संभाजीनगरातील रेल्वेचे लाेकाे पायलट शिवशंकर लक्ष्मण टाकळीकर (वय ५०) यांची अभियंता असलेली मुलगी प्राजक्ता (वय २३) हिने घरात अाेढणीने गळफास घेऊन अात्महत्या केली हाेती. तिचेही शिक्षण एमई झाले हाेते. 
 
स्नेहलने असा निर्णय का घेतला असावा? 
उच्चशिक्षित असलेल्या स्नेहलने अात्महत्या नेमक्या काेणत्या कारणासाठी केली. हे मात्र कळू शकले नाही. तिचे सर्व कुटुंब हे उच्चशिक्षित अाहे. बहीण शीतल डाॅक्टर तर भाऊ श्यामलाल अभियंता आहे तसेच वडीलही निवृत्त अभियंता अाहेत. घरात अतिशय चांगले वातावरण असताना तिने नेमकी अात्महत्या का केली? असा प्रश्न परिवार आणि अाजूबाजूच्या रहिवाशांना पडला आहे. 
बातम्या आणखी आहेत...