आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; सुसाइड नाेटमध्ये अाईची मागितली माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अारएमएस काॅलनी परिसरातील पंडितराव काॅलनीतील तरुणाने साेमवारी सायंकाळी वाजता अाईला फ्यूजची तार अाणण्यास सांगून घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. पाेलिसांना तरुणाने लिहिलेली सुसाइड नाेट सापडली अाहे. मात्र, त्यात त्याने काेणत्या कारणामुळे अात्महत्या करताे अाहे याचा उल्लेख केलेला नाही; फक्त अाईची माफी मागितली अाहे.
 
याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. 
पंडितराव काॅलनीतील याेगेश प्रकाश पाटील (वय २७) हा चार महिन्यांपासून रिंग राेडवरील एका खासगी कंपनीच्या शाेरूममध्ये काम करीत हाेता. पूर्वी ताे पुण्यात एका कंपनीत कामाला हाेता. त्यानंतर पुन्हा जळगावात येऊन त्याने एका कंपनीत नाेकरी केली. त्यानंतर त्याच्याकडे प्लास्टिकच्यावस्तूंची डिस्ट्रीब्यूटरशिप हाेती. मात्र, या धंद्यात त्याला माेठा ताेटा झाला. त्यात त्याच्यावर कर्जही झाले. त्यामुळे त्याने हा व्यवसाय बंद करून पाच महिन्यांपूर्वी पुन्हा एका इलेक्ट्राॅनिक्स कंपनीत दुरुस्तीचे काम सुरू केले हाेते. त्याचे वडील प्रकाश पाटील हे एका सीएकडे नाेकरी करतात, तर अाई कल्पना पाटील यासुद्धा काम करतात. माेठा भाऊ गणेश पाटील हा वेगळा राहताे. ताे एका ट्रॅव्हल्स बसवर चालकाचे काम करताे. 
 
फ्यूजवायर अाणण्यास पाठविले :साेमवारी याेगेश घरात त्याच्या नेहमीच्या डायरीवर लिखाण करीत बसलेला हाेता. त्याच वेळी सायंकाळी वाजता त्याची अाई घरी अाली. या वेळी त्याने अाईला घरातील फ्यूज उडालेला अाहे. त्यासाठी लागणारी वायर बाजूच्यांकडून अाणण्यास सांगितले. त्यानुसार कल्पना पाटील या वायर घेण्यासाठी गेल्या. त्या ठिकाणी अाेळखीचे भेटल्याने त्यांच्याशी गप्पा मारत त्या उभ्या राहिल्या. त्यानंतर दुकानावर साखर घेण्यासाठी गेल्या. तसेच सायंकाळी ६.४५ वाजता याेगेशचे वडील प्रकाश पाटील हे कामावरून घरी परत अाले असता, समाेरचे दृश्य बघून त्यांची शुद्धच हरपली. त्यांचा मुलगा याेगेशने प्लास्टिकच्या पॅकिंग वायरने छताला गळफास घेतलेला हाेता. त्यांनी अारडाअाेरड केली. ती एेकूून याेगेशची अाई धावत अाली. त्यांनादेखील समाेरचे चित्र बघून भाेवळ अाली. शेजारच्यांनी याेगेशला तत्काळ खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी सिव्हिलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिसात नाेंद करण्यात अाली अाहे. 

काय अाहे चिठ्ठीमध्ये? 
याेगेश याने कंपनीच्या राेजचा हिशेब लिहिण्याच्या डायरीत सुसाइट नाेट लिहून ठेवली होती. त्यात त्याने ‘प्रिय अाई, मला माफ कर. मी तुला फार दु:ख दिले अाहे. त्याबद्दल मला माफ कर. तू मला हे सुंदर अायुष्य दाखवले; पण मी ते स्वत: माझ्या हाताने खराब केले. मला माफ कर.’ असे लिहिले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...