आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेच्या शाखांचीही पारदर्शक चाैकशी करा- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाेपडा शाखेत ७३ काेटी रुपये बदलून देण्याच्या प्रकारात सीबीअायकडून चाैकशी सुरू झाली अाहे. सीबीअायने बँकेच्या इतर शाखांमध्ये देखील यासंदर्भात चाैकशी करून बदलण्यात अालेले पैसे कुणाचे हाेते, याचा शाेध घेत खरे दराेडेखाेर उजेडात अाणण्याची मागणी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली अाहे. यासंदर्भात सीबीअायच्या कार्यालयात लेखी पत्रदेखील देणार असल्याचे सहकार राज्यमंत्री पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 
 
जिल्हा बँकेकडे नाेटबंदीच्या काळात २०० काेटींपेक्षा अधिक जुन्या नाेटा जमा झाल्या अाहेत. अनेक शाखांमध्ये राजकीय दबावापाेटी जुन्या नाेटा बदलून देण्यात अाल्या अाहेत. चाेपडा शाखेत झालेला प्रकार जिल्ह्यातील अनेक शाखांमध्ये झाला अाहे. सीबीअायने अधिकाऱ्यांची चाैकशी सुरू केली अाहे, यात पैसे कुणाचे याचा शाेध लागला पाहिजे. जिल्हा बँकेत अनेक अधिकाऱ्यांनी नाेटबंदीच्या काळात कमिशनवर पैसे बदलून देण्याचे धंदे केले. याला राजकीय अभय असण्याची देखील शक्यता अाहे. बँकेतील खरे दराेडेखाेर शाेधून काढण्यासाठी सीबीअायच्या कार्यालयात प्रत्यक्ष पत्र देऊन मागणी करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 
 
शेतकऱ्यांच्या छाेट्या गाेष्टींवर बाेट 
जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या छाेट्या-छाेट्या गाेष्टींवर बाेट ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी दर्शवली हाेती. बँकेत अाता सत्ताधाऱ्यांनीच दराेडे टाकले अाहेत, हे कसे दिसले नाही. दराेडे टाकणाऱ्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
 
बँकेचे अधिकारी नाेकरी धाेक्यात घालून नाेटा बदलून देणार नाहीत. बँकेच्या कार्यकारी संचालकांवर काेणी दबाव अाणला? कुणाचे पैसे बदलून देण्यात अाले? हे समाेर अाले पाहिजे. ‘पारदर्शक’ चाैकशीसंदर्भात मी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार अाहे. बँकेचा कळवळा असलेले शेतकऱ्यांचे नेते अाता सीबीअाय चाैकशीबाबत प्रतिक्रिया का देत नाहीत? यासदंर्भात शंका येते. बँकेचे अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक काहीही बाेलत नाहीत.
 
बँकेतील नाेट बदली प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर करण्याचे जिल्हा उपनिबंधकांना अादेश दिले अाहेत. ती माहिती हाती अाल्यानंतर मी स्वत: बँकेत जाणार अाहे. अधिकाऱ्यांचा बळी घेण्यापेक्षा त्यांच्या मागे उभ्या असलेल्या लाेकांना शाेधले जाईल. यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहावर पत्रकारांशी बाेलताना दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...