आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीची छेड काढणाऱ्याला भोसकले, गणपती मिरवणुकीतून बाहेर ओढून केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ-विसर्जन मिरवणुकीत नाचण्यात दंग असलेल्या ललित ऊर्फ विक्की हरी मराठे (२१, रा.महात्मा फुलेनगर, भुसावळ) याची बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५० फूट अंतरावर चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.  बहिणीची छेड काढतो,  या कारणावरून मिरवणुकीतून बाहेर काढत ललितच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हत्येप्रकरणी बुधवारी पहाटे ३ वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी राजेंद्र ऊर्फ गाेलू सुभाष सावकारे याला अटक केली.   

मृत ललित मराठे आणि संशयित राजेंद्र ऊर्फ गाेलू हे न्यू सब्जी मंडी गणेश मंडळात कार्यरत हाेते. या मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाजवळ अाली. या वेळी संशयित राजेंद्रने ललितच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मिरवणुकीतून बाहेर काढले. रेल्वेच्या भिंतीजवळ अाल्यावर राजेंद्रने धारदार शस्त्राने ललितच्या छातीवर वार केला. यामुळे ललित रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच मित्रांनी त्याला शहरातील मानवतकर आणि नंतर गाेदावरी हाॅस्पिटलमध्ये हलवले. मात्र, उपचारापूर्वीच ललितचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अपर पाेलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी गाेदावरी हाॅस्पिटलमध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली. दुसरीकडे हत्येनंतर पोलिसांनी शहरातील विविध भागात बंदाेबस्त व गस्त वाढवली आहे. 
बातम्या आणखी आहेत...