आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिंदे यांनी भाजप ‘केमिस्ट’पदाधिकाऱ्यांना दिली दलालाची उपमा, उपाेषणस्थळी वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार शिंदे भाजप केमिस्ट पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद. - Divya Marathi
आमदार शिंदे भाजप केमिस्ट पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद.
जळगाव - भाजप केमिस्ट महासंघाने सुरू केलेल्या उपाेषणस्थळी अालेल्या अामदार जगन्नाथ शिंदेंनी थेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फुकटची लिडरशिप करू नका, ज्यांचे पैसे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या, तुम्ही दलाली कशाला करतात, असा अाराेप केल्याने वातावरण तापले हाेते. शिंदेंचे नेतृत्व असलेल्या एमएससीडीए लिमिटेडच्या शेअरवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर जाेरदार शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली. 
 
जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसीन डिलर्स असाेसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी केमिस्ट भवन येथे झाली. यानिमित्ताने अखिल भारतीय अाैषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष अामदार जगन्नाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती हाेती. या वेळी शिंदेंचे नेतृत्व असलेल्या कंपनीत सभासदांना त्यांच्या शेअर्सचे पैसे अदा केले जात नसल्याच्या कारणाने तसेच जिल्हा संघटनेतील अनियमितता बेकायदेशीर नियमबाह्य कामांचा निषेध करण्यासाठी भाजप केमिस्ट
महासंघाच्यावतीने केमिस्ट भवनासमाेर एक दिवसीय उपाेषण करण्यात अाले. सभा अाटाेपल्यानंतर अामदार शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे पदाधिकाऱ्यांना साेबत घेत उपाेषणस्थळ गाठले. या वेळी त्यांनी त्यांच्या लेखी मागण्या देण्याची सूचना करत चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला देऊन अांदाेलन संपवण्याचे अावाहन केले. उपाेषणाला प्रदेशाध्यक्ष किशाेर भंडारी, कनकमल राका, डाॅ. सतीश अागीवाल, साकीत चित्तलवाला, संजय नारखेडे, दिनेश येवले, नितीन इंगळे, नगरसेवक रवींद्र पाटील अादी उपस्थित हाेते. 

फटकेबाजीने वातावरण तापले 
भाजप केमिस्ट महासंघाच्या उपाेषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिंदेंचे उपाेषणकर्त्यांनी सुरुवातीला नमस्कार करून स्वागत केले. शिंदे यांनी तुम्हाला काय राजकारण करायचे ते तुम्ही करा; परंतु फुकटची लिडरशिप करू नका. ज्यांचे पैसे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या. कंपनी लिमिटेड असून खासगी नसल्याचा खुलासा करत मीडियासमाेर चुकीचे अाराेप करू नका. कंपनी नफा कमवण्यासाठी स्थापन केली नसून अाता कंपनीला चांगले दिवस अाल्याचे सांगितले. ज्यांचे पैसे घेणे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या, अशा शब्दात सुनावले. दरम्यान केमिस्ट बांधवांचे पैसे अाहेत त्यांना बाेलू दिले जात नाही, अावाज दाबण्याचा प्रयत्न केला जाताे, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी शाब्दिक चकमक वाढल्याने वातावरण तापले. दाेन्ही बाजूने समर्थक एकमेकांवर अाराेप करू लागले हाेते. 

दलालम्हणताच संताप 
चर्चासुरू असताना अामदार शिंदेंनी थेट भाजप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दलाल असल्याचे संबाेधले. शेअर्सचे ४० लाख रुपये अदा केलेले असताना तुम्ही कशाला दलाली करतात, असे शब्द उच्चारताच भाजप केमिस्ट महासंघाचे दीपक जाेशी, संजय नारखेडे, निशिकांत मंडाेरे, दिनेश येवले यांनी शिंदेंच्या वक्तव्याला अाक्षेप घेतला. चुकीचा शब्द वापरू नका, असा इशारा दिला. दीपक जाेशींनी शिंदेंना उद्देशुन तुमच्या समाेर चित्र वेगळे असते पाठीमागे वेगळेच चालते, असा खुलासा करत दलाल शब्दावरून शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला. 
 
वादामागचे नेमके कारण काय? 
केमिस्ट संघटनेचे राज्याचे अध्यक्ष तथा अामदार जगन्नाथ शिंदे यांनी केमिस्ट बांधवांच्या माध्यमातून एमएससीडीए लिमिटेड ही कंपनी स्थापन केली अाहे. या कंपनीने ‘लुपिन संगम’ ही कंपनी खरेदी करून त्या कंपनीच्या प्राॅडक्ट्सची अापल्या नावाने विक्री सुरू केली. केमिस्टनी त्या प्राॅडक्ट्सची विक्री केल्यास केमिस्ट कंपनीला फायदा हाेईल, हा उद्देश अाहे. या कंपनीसाठी केमिस्ट बांधवांनी शेअर्स खरेदी केले हाेते. सात वर्षांपूर्वी एका शेअरची किंमत १० रुपये हाेती. जळगाव जिल्ह्यातून सुमारे काेटी ५६ लाखांचे शेअर्स खरेदी झाले हाेते. त्यातील केवळ ३८ लाख रुपये परत करण्यात अाले अाहेत; परंतु कंपनी ताेट्यात असल्याने शेअर्सची रक्कम परत केली जात नसल्याचा मुद्दा भाजप केमिस्ट महासंघाने उपस्थित केला अाहे. शेअर्सची रक्कम परत करण्याच्या मुद्द्यावरून खरा वाद सुरू झाला अाहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, मंडप चाेरीचा अाराेप... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...