आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीडशे वर्षांनंतर काेर्टाला मिळणार नवीन इमारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात तब्बल दीडशे वर्षांनंतर न्यायालयाला नवीन इमारत मिळणार अाहे. या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले अाहे. शहरातील भव्य इमारतींपैकी काेर्टाची इमारत ठरणार अाहे. १२ न्यायदान कक्षांची व्यवस्था यात राहील. त्याचबराेबर वकिलांसाठीही माेकळी जागा राहणार अाहे. तरीही नव्या इमारतीची जागा अपूर्ण ठरण्याची शक्यता अाहे. त्यामुळे न्यायालयीन प्रशासनाने याच इमारतीवर अाणखी एक मजला वाढवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव अकरा महिन्यांपूर्वीच पाठवला हाेता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली अाहे. तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी ई-िनविदा प्रसिद्ध करण्यात अाली असून, ती दिल्यानंतरच प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात हाेणार अाहे.
शहरातील न्यायालयाची सध्याची इमारत ही ब्रिटिशकाळात दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात अाली. प्रारंभी रेल्वेस्थानकाच्या कामासाठी नंतर जिल्हा रुग्णालयासाठी या इमारतीचा वापर झाला. त्यानंतर न्यायालयाचे काम सुरू झाले. अपुऱ्या जागेमुळे एकाच न्यायदान कक्षाचे दाेन भाग करून विभागणी केली गेली अाहे. तसेच कक्षात अाराेपी, साक्षीदार, पाेिलस अाणि वकील, पक्षकार यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने अडचणींना ताेंड द्यावे लागत हाेते. त्या पार्श्वभूमीवर अावारात नवीन दाेनमजली इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून मुख्य न्यायालयाच्या पाठीमागील जागेत सुरू अाहे. या इमारतीचे काम जवळपास पूर्ण हाेत अाले अाहेत. मंजूर झालेल्या बांधण्यात अालेल्या नव्या इमारतीत एकूण अाठ न्यायदान कक्षांची व्यवस्था अाहे.मात्र सद्य:स्थितीत धुळे जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ही पंधरा इतकी अाहे. त्यामुळे नवीन इमारतीचे काम झाले असले तरी निम्म्या न्यायाधीशांची व्यवस्था काय, असा प्रश्न निर्माण झाला. त्यादृष्टीने अाणखी चार न्यायदान कक्षांची व्यवस्था तिसऱ्या मजल्यावर करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी तिसऱ्या मजल्याला परवानगी मिळावी म्हणून शासनाच्या विधी न्याय विभागामार्फत प्रस्ताव पाठवण्यात अाला हाेता.

या प्रस्तावाला चार महिन्यांपूर्वीच शासनाकडून मंजुरी मिळाली अाहे. त्याबाबतचे मंजुरीचे अादेश अाणि इतर कागदपत्र प्राप्तीनंतर अाता इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी ई-निविदा पद्धतीने निविदा मागवण्यात अाल्या अाहेत. निविदा प्रक्रियेनंतरच तिसऱ्या मजल्याच्या कामाला सुरुवात हाेणार अाहे. तिसऱ्या मजल्याचे काम झाले तरी काही न्यायाधीशांना जागा अपूर्ण पडणार असल्याने अजूनही चाैथा मजला उभारणीबाबत न्यायालय प्रशासनाकडून विचार सुरू अाहे. मात्र जाेपर्यंत तिसऱ्या मजल्याच्या कामाला सुरुवात हाेत नाही ताेपर्यंत काहीच करता येणार नसल्याने न्यायालयीन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात अाले अाहे. तिसऱ्या मजल्याच्या बांधकामामुळे अजून किमान वर्षभर तरी नवीन इमारतीचा वापर न्यायालयीन कामकाजासाठी हाेऊ शकणार नाही.
वकील कक्षाची अडचण
जागे अभावीबहुतांश वकिलांनी न्यायालयाच्या बाहेर खासगी इमारतीत जागा घेऊन अापली कार्यालये सुरू केली अाहेत. दाेन ते तीन खासगी इमारतीत अॅडव्हाेकेट चेंबर्स अाहेत. मात्र नवीन न्यायालयाची इमारत झाल्यानंतर इतर जागेत वकिलांसाठी जागा उपलब्ध हाेऊ शकते. मात्र सद्य:स्थितीत वकिलांसाठी जागा अपूर्ण पडत अाहेत. नव्या इमारतीत मात्र ही कमतरता भरून निघणार आहे.
दाेनमजली इमारत पूर्ण
दाेनमजली इमारतीचे काम पूर्ण झाले अाहे. त्यात सुरक्षेच्या दृष्टीने एकाच बाजूने इमारतीत प्रवेश असणार अाहे. पुढील बाजूला व्हरांडा ठेवण्यात अाला असून, त्याला बाहेरून लाेखंडी जाळी बसवण्यात अाली अाहे. दाेन मजले असल्याने मध्यभागी वरच्या बाजूला जाण्यासाठी जिन्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे. जेणेकरून सर्वांना साेईचे हाेईल.

साडेसाेळा काेटींचा निधी
दाेन मजली इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला अाहे. त्यामुळे अातापर्यंत न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास शासनाकडून १६ काेटी ४४ लाख ४९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला अाहे. तसेच नव्या तिसऱ्या मजल्यामुळे अजून चार न्यायदान कक्षांची व्यवस्था हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...